शिवसेना,युवासेना,विद्यार्थी सेना खेरवाडी यांच्या आंदोलनामुळे बंद बससेवा पुन्हा सुरु

424
जाहिरात

समाधान भाऊसाहेब कोकाटे
निफाड तालुका प्रतिनिधी

बंद झालेल्या बस पुन्हा पुर्ववत करण्यासाठी प्रत्यक्ष नाशिक येथे आगार वाहतूक प्रमुख श्री.गणोरे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा व निवेदन दि. २१/०८/२०१८ रोजी देण्यात आले. त्यादिवसापासून पासून नाशिक येथून सै.पिंप्री खेरवाडी मार्गे येणाऱ्या बस पिंप्री मार्गे ओझर वळविण्यात आल्याचे लक्षात येताच त्या पुन्हा पुर्ववत चालू करण्यासाठी त्याच दिवशी जि.प.सदस्य, दिपकभाऊ शिरसाठ , पं.स. सदस्या रत्नाताई संगमनेरे यांचे पती शंकर संगमनेरे , भा.विद्यार्थी सेना माजी तालुका अध्यक्ष सुभाषभाऊ आवारे, शिवसेना शहरप्रमुख सुनिल संगमनेरे , सतिश संगमनेरे , ग्रा. पं. उप सरपंच मायावती संगमनेरे यांचे पती दशरथ संगमनेरे ,व मा. सदस्य गोविंदराव संगमनेरे , बापू संगमनेरे , शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी , शिवसैनिक , युवासैनिक यांसह पालकांसमवेत खेरवाडी चौफुली येथे आंदोलन करण्यात येवून तातडीने नाशिक येथे वरील सर्व जावून वाहतूक नियंञक गणोरे यांच्याशी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात आणून दिल्यानंतर व आ.अनिल आण्णा कदम यांचे फोनवर आगार प्रमुखांशी झालेल्या चर्चानंतर रितसर शिवसेनेने निवेदन दिल्यानंतर पुढील दोनच दिवसात अनेक बस फेऱ्या पुन्हा पिंप्री खेरवाडी मार्गे सायखेडा सुरु झाल्यात. (निवेदनाचे पञ, व वर्तमानपञातील बातमी आपल्या माहितीसाठी टाकत आहोत.) यापुढे चालक व वाहक यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत व शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांस ने आण करण्यासाठी सहकार्य न केल्यास तशा तक्रारी विद्यार्थ्यांनी दिल्यास पुन्हा आ.अनिल आण्णा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आगारी प्रमुख कार्यालयात शिवसेना आंदोलन करेल.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।