👉🏻चांदुर बाजार आणि शिरजगाव कसबा पोलिसांचे रुटमार्च द्वारे शक्ती प्रदर्शन 👉🏻अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे नेतृत्व

0
1186
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार आणि शिरजगाव कसबा पोलिसांचे रुटमार्च द्वारे शक्ती प्रदर्शन

👉🏻अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे नेतृत्व

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

*👉🏻चांदुर बाजार आणि शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत पहिल्यांदा च सीआरपिफ च्या तुकडी चे रुतमार्च करण्यात आले.या दोन्ही ठिकाणचे रुतमार्च अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अबदगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.*

*गणेशोत्सव हा सुरुवात झाली असून यांचं दरम्यान मोहरम सुद्धा येत आहे या नंतर नवरात्री त्यामुळे येणाऱ्या सण उसत्व दरम्यान कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था ला तडा जाणार नाही याची सर्व जबाबदारी ही पोलिस विभाग पार पाडत असतो. मात्र याच दरम्यान अवैध करणारे धुमाकूळ करताना दिसतात या सर्वांवर आपली करडी नजर ठेवण्यासाठी तसेच पोलीस विभाग कायदा आणि सुव्यवस्था संरक्षण करण्यास सतर्क असल्याचे या रुतमार्च वेळी पाहायला मिळाले.
यावेळी चांदुर बाजार येथील रुतमार्च स्थानिक पोलीस स्टेशन मधून निघालेला निघून कसाब पुरा,राउत पुरा,ग्रामीण रुग्णालयात रोड, नेताजी चौक, जयस्तंभ चौक मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये परत आला.*या रुट मार्च* मध्ये सीआरपिफ चे अधिकारी आणि कर्मचारी 85,आरसिपी होमग्राऊंड अधिकारी आणि कर्मचारी 70तसेच स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजय आकरे आणि कर्मचारी होते.
त्यानंतर हेच शक्ती प्रदर्शन शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन गावामध्ये पाहायला मिळाले*.*यावेळी शिरजगाव कसबा चे ठानेदार मुकुंद कवाडे उपस्थित होते*.*

या दोन्ही पोलीस स्टेशन मधील रुतमार्च चे नेतृत्व अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी अबदगिरे यांनी केले.
0000