सहा जणांना आदर्श ग्रामरत्न पुरस्कार प्राप्त

0
718
Google search engine
Google search engine

चांगले काम करूण गावचा नावलौकिक वाढवावा – दत्ताभाऊ सोनटक्के

(टाकळी येथे “आदर्श ग्रामरत्न पुरस्कार वितरणात प्रतिपादन)

—————————————
उस्मानाबाद. प्रतिनिधी,दि.१७
आपण अतिषय हालाकिच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलात,या गावच्या मातीमुळे आज तुंम्ही वेगवेगळ्या क्षेञात भरारी घेत आहात याच उद्देशानेआपला टाकळी(बें)ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ यांचे वतिने “आदर्श ग्राम रत्न पुरस्कार २०१८ “देऊन गौरवण्यात येत आहे .या पुढेही आजच्या गावातील सत्कार मुर्तींनी विविध क्षेञात चांगले काम करूण गावचानावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन टाकळी येथील “आदर्श ग्राम पुरस्कार२०१८” वितरण समारंभात मा.दत्ताभाऊ सोनटक्के यांनी केले आहे.
प्रथमच टाकळी ग्रामपंचायतने गावातील परिस्थितीतून मोठे झालेल्या निवडक सहा नोकरदारांना पुरस्काराने गौरविले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आशाबाई दत्ताभाऊसोनटक्के सरपंच या होत्या यावेळी उपसरपंच पीरसाब शेख,बापु सुर्यवंशी,वर्धमान शीरगीरे,रब्बाणी शेख,काकासाहेब पाटील,प्रताप गायकवाड,श्रीमंतसोनटक्के,नागोराव सोनटक्के या ग्रामपंचायत सदस्यासह ,श्रीमंत खटके ,बाबु लातुरे,भारत सोनटक्के ,बाबाराव सोनटक्के उपस्थित होते.
या समारंभात
गावातील सुर्यकांत खटके जिल्हा कोषागार कार्यालय सोलापूर,प्रा.राजा निवृत्ती जगताप रामकृष्ण परमहंस महाविद्यालय ,मराठी विभाग उस्मानाबाद,विशाल अंगद सुर्यवंशी सहशिक्षक आरळी तुळजापूर ,अमोल राम डायरे सहशिक्षक टेंभुंर्णी, सुरज बालाजी फोलाणे सरकारी रूग्नालय कोंड ,व्यंकट हरिराम खटके एस .टी.आय .मध्ये निवड झाल्याने आज यांना ग्रामपंचायतच्या वतिने “आदर्श ग्राम पुरस्कार २०१८” देऊन मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले आहे .
यावेळी सत्कार मुर्ती सहा जनांबरोबरच वर्धमान शीरगीरे .बाबु लातुरे यांनी मनोगते व्यक्त केली .
या समारंभाला सत्कार मुर्तींचे आई ,वडील यांचे बरोबरच गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने ऊपस्थित होते
सूञसंचालन धर्मराज कदम यांनी केले तर आभार वर्धमान शीरगीरे यांनी मानले