आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत विद्यार्थी ,पालकांनी, सावध व सतर्क रहावे – ठाणेदार गजानन शेळके

533

आकोट/ संतोष विणके – आजच्या सामाजिक वातावरणा मुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळा मध्ये कीशोर वयीन व तरुण मुलाकडे जागरूक पणाने लक्ष देणे फार आवश्यक असून ,अश्या मुलांकडून घडलेली एक चूक त्याचे अवघे जीवन बरबाद करण्यास कारणीभूत ठरु शकते तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत विद्यार्थी ,पालकांनी, सावध व सतर्क रहावे असे प्रतिपादन अकोट शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी व्यक्त केले,

अकोट शहरातील विद्यार्थी व पालकां साठी अकोट शहर पोलिस्टेशनच्या सावली सभागृहात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते, ह्या वेळी सभागृह तुडुंब भरले होते तसेच सभागृहाच्या बाहेर सुद्धा मुलांनी गर्दी केली होती, सध्याच्या काळात पालकांची व शिक्षकांची जबाबदारी खूप वाढली आहे, मुलांना वाम मार्गाला लावण्या साठी अनेक माध्यमे उपलब्ध आहे, त्या मध्ये लहान मुलांना अगदी सहज उपलब्ध होणारे स्मार्ट फोन, मोबाईल फोनचा जबाबदारीने वापर करण्या एवढी परिपक्वता मुलामध्ये नसल्याने, त्याचा गैरवापर होण्याची शक्यताच जास्त असते, त्या मुळे मुलांना स्मार्ट फोन लहान वयात पालकांनी देऊ नये हे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले तसेच लहान मुलांना मोटर सायकल, स्कुटर इत्यादी वाहने दिल्यास ते भरधाव वेगाने वाहने चालवून हकनाक स्वतः चा व दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात, तसेच घरून पळून जाण्याचे धोके, अल्पवयीन प्रेम प्रकरणाचे दुष्परिणाम असे अनेक विषयांवर ठाणेदार गजानन शेळके यांनी 1 तास पेक्षा जास्त मार्गदर्शन केले.,

यावेळी त्यांनी सत्य घटना सांगून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले , सदर मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्या साठी फ्रीडम क्लास चे मनोज झाडे सर, ठाकूर सर तसेच इतर शिकवणी वर्गाच्या संचालकांनी परिश्रम घेतले, बऱ्याच कालावधी नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या साठी पोलिस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने उपस्थित विद्यार्थी व पालक ह्यांनी समाधान व्यक्त केले।

जाहिरात