आसेगावात घरकुलासाठी सातव्या दिवशीही उपोषण सुरू

0
733
Google search engine
Google search engine

आशेगावात घरकुलासाठी सातव्या दिवशीही उपोषण सुरू।
* प्रशासन व जनप्रतिनिधी याची उपोषण मंडपाला भेट नाही।
किशोर मेटे:-( चा. बा)
तालुक्यातील आशेगाव पूर्णा या गावातिल दारिद्र रेषेखालील नागरिकांना पंडित दीनदयाल प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्याच्या राहत्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे याकरिता युवा संघर्ष समितीचे संस्थापक जितेंद्र मस्करे ,व त्याचे सहकारी , महिला पुरुष व गावकरी मंडळी गेल्या सात दिवसापासून साखळी उपोषणाला सुरवात केली असता आज उपोषणाचा सातवा दिवस उजळूनही कोणत्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व जनप्रतिनिधींनी या साखळी उपोषणाची दखल घेतली नाही।
आशेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूला 35 ते 40 वर्षापासून अनेक कुटंब कुळा मातीच्या घरात आहे। प्रत्येकाला घर मिळावे या करिता शासनाची महत्वकाशी दीनदयाल प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली असताना भोगवर्ग दोन मध्ये ही जागा येत असल्याने अनेक कुटंब या घरकुल योजने पासून वंचित राहत असल्यामुळे या जागेला नियमानकुल करून या जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे या करिता सात दिवसापासून आशेगावत गावकराचे उपोषण सुरू असताना अद्याप पर्यत शासन स्तरावर या उपोषणाची दखल घेतल्या गेली नसून या परिसरातील कोणत्याही जनप्रतिनिधी या उपोषण कर्ता ची भेट घेतली नाही। तरी आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा बागळुन नागरिक अहिंसेच्या मार्गाने लढा देऊन आपले साखळी उपोषण करीत आहे। वृत्त लिहिस्तो पर्यत शासनाचा कोणताच अधिकारी उपोषण मंडपाकडे फिरकला नाही।
फोटो मेल केला।