त्या नराधमाला फाशीची द्यावी मागणी -तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन

0
998
Google search engine
Google search engine

. दानापूर/विशेष प्रतीनीधी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील 18 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय नराधमा विरूद्ध जलदगती न्यायालयात प्रकरण निकाली काढून फाशीची शिक्षा घ्या या मागणीचे निवेदन तेल्हारा तहसीलदार यांना बारी समाजाच्या वतीने देण्यात आले . बुलढाणा जिल्ह्य़ातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे प्रकाश पांडूरंग लोणे या 45 वर्षीय नराधमाने गावातील एका 18 वर्षीय मुलीचा घरात रॉकेल मागण्याच्या बहाण्याने प्रवेश करून मतिमंद मुलीवर अत्याचार केला .आरोपीला पोलीसांनी अटक केली असून या प्रकरणाला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा घ्या या मागणीचे निवेदन तेल्हारा तालुका बारी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले .या निवेदनावर सुभाष रौंदळे ,मधुकर पोके,प्रमोद रेखाते ,विनोद पोके,देवेंद्र नाठे,विरेंद्र येऊल ,पंकज रौंदळे, डाॅ.विजय राऊत ,सुनिल धुरडे ,शहादेव ढगे ,प्रल्हाद रौंदळे,विशाल हागे,गणेश ताळे,सागर ढगे ,भगवान हागे ,अशोक नाठे , वासुदेव कतोरे ,दिपक पोके ,कैलास बोडखे ,या सह सर्व समाज बांधवांच्या सह्या आहेत .त्वरीत कार्यवाही न झाल्यास ता.(25) सप्टेंबर रोजी बारी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा हि निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .