मनसेच्या उल्हास नगर शहर संघटकपदी मैनुद्दिन भाई यांची निवड

0
626

मनसेच्या उल्हास नगर शहर संघटकपदी मैनुद्दिन भाई यांची निवड

प्रतिनीधी -हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

उस्मानाबाद -खळ्ळ खट्ट्याक फेम, धडाकेबाज महाराष्ट्र सैनिक,उस्मानाबाद जिल्ह्याचे सुपुत्र मैनुद्दीन भाई शेख यांची मनसेच्या उल्हासनगर शहर संघटक” पदी वर्णी लागल्यामुळे मनसैनीकात जल्लोष
मराठवाडा,उस्मानाबाद जिल्ह्याचे सुपुत्र,कट्टर राज समर्थक,जहाल महाराष्ट्र सैनिक,उल्हासनगर मनसेचा बुलंद आवाज श्री मैनुद्दीन भाई शेख यांची मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते राजु दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “उल्हासनगर शहर संघटक” पदी नियुक्ती झाली आहे,*
उस्मानाबाद जिल्ह्यातील,आपल्या मातीतील व्यक्तीला ठाणे जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराचे नेतृत्व करण्याची संधी श्री मैनुद्दीन शेख यांच्या रूपाने मा.राजसाहेब ठाकरे आणि राजू दादा पाटील यांनी दिलेली आहे,त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मा.,राजसाहेब ठाकरे आणि मनसे नेते राजू दादा यांचे संपूर्ण जिल्हा आणि मनसे जिल्हा कार्यकारिणी तर्फे हार्दीक आभार व्यक्त करण्यात येत आहेत,
मा.मैनुद्दीन भाई यांनी मनसे च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडवून स्वतःचा,आपल्या पक्षाचा, आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा ही उस्मानाबाद जिल्ह्यातील तमाम जनतेकडून शुभेछांचा वर्षाव होत आहे