*👉🏻विध्यर्थिनी च्या अपहरण प्रकरणातील आरोपी शिक्षकास अटक,* *👉🏻 *भादवी 354,पोस्को 8,10,12,अट्रोसिटी कायदा 3 प्रमाणे गुन्ह्याची नोंद,शिक्षक याला तीन दिवसांची पोलिस कोठडी

0
2392

*👉🏻विध्यर्थिनी च्या अपहरण प्रकरणातील आरोपी शिक्षकास अटक,*
*👉🏻
*भादवी 354,पोस्को 8,10,12,अट्रोसिटी कायदा 3 प्रमाणे गुन्ह्याची नोंद*
*,विद्यार्थिनी च्या बयान वर गुन्हे दाखल*

चांदुर बाजार:-तालुका प्रतिनिधी
*——————————————-*

👉🏻स्थानिक दौ.सी काळे विद्यालयातील एक अल्पवयीन विध्यर्थिनी ला पळवून नेऊन डांबून ठेवल्या मुळे आधीच चांदुर बाजार पोलिसांनी पालकांच्या तक्रार वरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.
दिनांक 18सप्टेंबर ला पीडित विध्यर्थिनी अमरावती च्या महिला व बालकल्याण समिती समोर दिलेल्या बयान नुसार रात्री उशिरा पर्यत आरोपी शिक्षका वर *भादवी 354,पोस्को 8,10,12,अट्रोसिटी कायदा 3 प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहे.तसेच सदर आरोपीस रात्री 11 ते 12 च्या सुमारास अमरावती येथून चांदुर बाजार पोलीस टीम ने अटक करणायत आली आहे.

आज दिनांक 19 सप्टेंबर ला सदर आरोपी शिक्षक याला न्यायालयात सादर करण्यात येऊन पुढील तपास साठी पोलीस कोठडी मागितली जाणार आहे.आरोपी शिक्षक याला पोलीस कोठडी मिळाल्यास या प्रकरणातील अनेक बाबी पोलिसांसमोर उघड होण्याची शक्यता वर्तवली जाण्याची शक्यता आहे.सदर आरोपीने अल्पवयीन पीडितेस शहरातील आपला मित्र असलेल्या विधुत कॉलनीतील एका जिवलग मित्राकडे नेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.त्यावरून घटना स्थळ पंचनामा व सादर खोली मालकाची कसून चौकशी केली जाणार आहे.तसेच शाळेतील इतरही शिक्षक चौकशी सोबत जबानी नोंदवण्याची शक्यता आहे.पुढील तपास अंती प्रकरणातील सत्य काय ते लवकरच समोर येणार असल्याची दिसत आहे.

आरोपी शिक्षक संदेश काजळकर यास अमरावती येथून पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे,पोलिस कॉस्टबल पंकज फाटे,अनिल मोरे,किरण बाबल,अरविंद गावडे यांनी ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली आहे.

आरोपी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक 21 सप्टेंबर म्हणजे तीन दिवसा पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे पोलिसांच्या हाती आणखी काही सुराग लागतील अशी चर्चा सुरू आहे.

सदरहू प्रकरण पुढील चौकशी करीत उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे याच्या सोपविण्यात आले आहे.

(अटक आरोपी सोबत चांदुर बाजार पोलीस टीम)