लवरात्रीचे चित्रपटाचे नाव लवयात्री होणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तींचा परिणाम ! – हिंदु जनजागृती समिती

0
1097

हिंदूंच्या पवित्र अशा नवरात्री उत्सवाच्या काळात आणि नवरात्री या नावाशी साधर्म्य असलेला लवरात्री हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट सिनेअभिनेता सलमान खान यांनी घातला होताया विरोधात हिंदु जनजागृती समितीसह भारतभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून वैध मार्गाने आंदोलने केलीतसेच गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड),प्रशासकीय अधिकारीमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली होतीयासमवेतच बिहारमधील अधिवक्ता सुधीरकुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर येथील न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केली होती आणि न्यायालयानेही पोलिसांना सलमान खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होतेएकूणच या सर्वांचा परिणाम म्हणूनच सलमान खान यांनी चित्रपटाचे नाव लवरात्रीवरून लवयात्री असे पालटलेहिंदूंच्या संघटित आणि वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाचाच हा परिणाम असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी व्यक्त केले.

        सलमान खान यांनी जसे हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर का होईना हिंदूंच्या धर्मभावनांची दखल घेतलीतशी चित्रपट सृष्टीतील अन्य निर्मात्यांनीही घ्यावीअसे आवाहनही श्रीशिंदे यांनी केलेते पुढे म्हणाले कीचित्रपटाचे नाव पालटले हे योग्य असलेतरी आम्ही प्रत्यक्ष चित्रपट पाहिलेला नाही.त्यामुळे चित्रपटात जर हिंदूंच्या देवताधर्मसण यांच्या संदर्भात आक्षेपार्ह संवादचित्रण असेलतर त्याविरोधात पुन्हा आंदोलन छेडले जाईलअशी चेतावणीही श्रीशिंदे यांनी दिली.