मोहरमच्या मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडपांचा आकार लहान करा ! – पोलीस

0
721

 

सातारा – मोहरमच्या निमित्ताने शहरातून ताबूताच्या मिरवणुका निघणार आहेत. ३५ वर्षांनंतर गणेशोत्सवाच्या काळात मोहरम येत आहे. ताबूताची मिरवणूक ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरील गणेशोत्सव मंडपाच्या रचनेत पालट करण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे, असे सूत्रांकडून कळते.

या आदेशानंतर काही गणेशोत्सव मंडळांनी मोहरमच्या मिरवणुकीस अडथळा होऊ नये, यासाठी त्यांच्या मंडळांची रचना पालटून त्याचा आकार लहान केला आहे. एका गणेशोत्सव मंडळाने तर गणपती मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या जागेतही पालट केला आहे.  पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठक घेऊन त्यांना ताबूताच्या मिरवणुकीसाठी जागा करण्याचा आदेश दिल्याचे समजते. याविषयी पोलीस आणि प्रशासनाकडून मंडळांवर दबाव आहे किंवा कसे, हे मात्र समजू शकलेले नाही.