डॉल्बीवरील बंदी कायम – हायकोर्टाचा डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार

0
973

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. हायकोर्टानं डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार देत पाला संघटनेची याचिका फेटाळून लावली. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर कोर्टानं डीजेवरची बंदी कायम ठेवली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी चालणार नाही.