👉🏻आरोपी शिक्षक यांच्या सहकाऱ्यांस अटक

0
1816
  • 👉🏻आरोपी शिक्षक यांच्या सहकाऱ्यांस अटक,

चांदुर बाजार :-तालुका प्रतिनिधी

स्थानिक दौ सी काळे विद्यालयातील अपहरण आणि विनयभंग प्रकरणात आरोपी शिक्षक स्वतःच्या घरातील खोली उपयोग मदत करणारा आरोपी शिक्षक चा मित्र सनी उर्फ संकेत शरद वानखडे वय 25 रा.वैष्णव टॉकीज च्या मागे शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील घरातून दिनांक 19 सप्टेंबर ला सायंकाळी 7 च्या सुमारास अटक करण्यात आली.
आरोपी शिक्षक मदत करणाऱ्या त्याच्या या मित्रावरही
भादवी 354, 34,पोस्को 8,10,12,अट्रोसिटी कायदा 3,34 अन्वेय गुन्ह्याची नोंद करण्यात आली.सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी संदेश काजळकर हा पोलिसांच्या कस्टडी मध्ये असल्याने या प्रकरणात आणखी काही सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.आरोपी च्या मदतनीस यास अटक झाल्यामुळे आरोपी ने या आधीही अश्याच या प्रकारचे कृत्य केले होते का?ज्या ठिकाणी हा प्रकार झाला त्या ठिकाणी पंचनामा ही पोलिसांकडून होणे बाकी आहे.त्यामुळे या प्रकरणात मध्ये सध्या तरी अनेक जण पोलिसांच्या रडावर येण्याची शकता आहे.
एकंदरीत दिवसेंदिवस या विनियभाग प्रकरणाचा गुंता वाढत आहे.त्यामुळे शालेय परिसरातील आपली मुलगी सुरक्षित की असुरक्षित अशा प्रश्न तालुक्यातील मुलीच्या पालकांमध्ये निर्माण झाला आहे.या प्रकरण मुळे प्रत्येक शालेय मुलींच्या पालकांच्या मनात संशय ची पाल चुकचुकायला लागल्याचे पालक वर्गाच्या एकंदरीत चर्चेवरून स्पस्ट दिसून येते आहे.
या प्रकरणातील दुसरा सहकारी मित्र आरोपी यास ठाणेदार अजय आकरे याच्या मार्गदर्शन खाली पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे,पोलिस स्टेशन खुपिया विरेंद्र अमृतकर, नाईक पोलीस कॉस्टबल अरविंद गावडे, पंकज फाटे यांनी सदर आरोपी याला त्याच्या मूळ राहत्या घरून अटक केले.