विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातून ४० जणांना तडीपारीचे आदेश

0
757

अकोट/प्रतिनीधी – आकोट शहर हे शासन दरबारी अतिसंवेदनशील शहर म्हणून घोषित असल्याने आगामी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने अकोट शहर पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातून ४० जणांना तडीपारीचे आदेश बजावण्यात आले. आहेत.विसर्जन दिवशी आकोट शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, पोलिस स्टेशन अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व सहाय्यक सहाय्यक पोलिस निरीक्षक फड, पोलिस उपनिरीक्षक गवई,शिंदे, हे अधिकारी प्रत्येक गणेश मंडळाला भेट देऊन कॉर्नर मीटिंग घेत आहेत व महाआरती मध्ये सहभागी होत आहेत , विसर्जनाच्या दिवशी गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम शहरात राहू नये म्हणून अकोट शहरातील 40 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसम ह्यांना दिनांक 23।9।18 व 24।9।18 ह्या दोन दिवसा साठी अकोट शहरातून निघून जाण्याचे आदेश अकोट उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत ह्यांनी दिले असून अकोट शहर पोलिसांनी त्यांना सदर आदेश बजावणे सुरू केले आहे.