मनसेच्या ठाण्याच्या रशिदा सय्यद यांनी मजुराला दिला आधार ;मजुराचा मालकाने बुडवलेला पगार मनसे स्टाईलने केला वसुल

0
1822

मनसेच्या ठाण्याच्या रशिदा सय्यद यांनी मजुराला दिला आधार ;मजुराचा मालकाने बुडवलेला पगार मनसे स्टाईलने केला वसुल

उस्मानाबाद-हुकमत मुलाणी

उस्मानाबाद- मनसेच्या ठाणे येथील महिला आघाडीच्या शहर सचिव खळखट्याक फेम रशिदा सय्यद यांनी नवी मुंबई येथील एका मजुराचा दोन महिन्याचा पगार मालकाने बुडवला होता त्या मजुराला घेऊन कंपनीत जाऊन त्याचा दोन महिन्याचा ३५००० हजार रुपये मिळवून दिल्यामुळे त्या गरिब मजुराला आधार देऊन त्याला दिलासा दिला आहे मजुराचे नाव रमाकांत असे आहे रशिदा सय्यद यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मजूर कामगार रमाकांत ला घेऊन नवी मुंबई येथील कंपनी मालकाकडे गेले व त्या मालकाला जबर तंब्बी देऊन मनसे स्टाईलने त्याची बोलती बंद करून त्याला मजुराचा पगार देणे भाग पाडले
मजूर मजबुर होऊन रशिदा सय्याद यांच्याकडे आला होता त्याने रशिदा आपा कडे धाव घेऊन त्याची हकीकत सांगितली होती रशिदा आपांनी हकीकत ऐकून घेऊन त्या कर्मचार्‍याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले रशिदा आपांनी ठाणे येथील महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष मंजुताईना व शहराध्यक्ष रोहिणी निंबाळकर यांना सोबत घेऊन नवी मुंबई येथील असलेल्या एका खाजगी कंपनीमार्फत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे त्या कंपनीतील हा प्रकार होता नवी मुंबई येथील कोपरखेरणा येथील कंपनीमध्ये जाऊन त्या गुत्तेदाराला या तीन मनसेच्या महिला पदाधिकार्‍यांनी जाऊन कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीचे हकीकत सांगितली तर त्या मालकाला यांना पाहून घामच फुटला सदर मालक या तीन महिला पाहून मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना आसल्यामुळे त्याला घामच फुटला व त्याची बोबडी तर वळलीच परंतु बोलत असताना सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत होता या महिलांना पाहून व यांचे वातावरण बघून मालक म्हणाला मी त्या कर्मचाऱ्यांचा पगार देणारच होतो मला मला काही अडचण असल्यामुळे दिला नाही असे सांगितले नंतर त्याचा पगार रशिदा आपांच्या समोर तात्काळ त्या कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला त्यामुळे ठाण्याच्या मनसे शहर सचिव धाडसी व गोरगरीब जनतेच्या अडिआडचणीला धाऊन जाणार्या सतत अग्रेसर असलेल्या व सतत लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या मनसेच्या ठाणे महिला आघाडिच्या शहर सचिव रशिदा आप्पा यांच्या प्रयत्नाला यश आले आहे त्यामुळे त्यांचे सर्व कार्यकरत्याकडून आभिनंदन केले जात आहे रशिदा आपा या मुळच्या लातूर येथील रहिवाशी आहेत त्यांनी मनसे मध्ये आल्यापासून बर्याच लोकांना न्याय मिळन देण्यात त्या आग्रेसर आसतात या त्यांनी केलेल्या कामांमुळे मनसेत त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे