दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य !

0
1058
Google search engine
Google search engine

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पोलंडमधील वैज्ञानिक परिषदेत स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिसया संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधप्रबंध सादर !

बहुतांश झोपेशी संबंधित व्याधींचे मूलभूत कारण आध्यात्मिक असतेज्या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असतेत्यांचे संपूर्ण आणि कायमस्वरूपी निवारण केवळ आध्यात्मिक उपायांनीच होऊ शकतेनामजपासारखी दैनंदिन आध्यात्मिक साधना जीवनातील समस्यांच्या मूलभूत आध्यात्मिक कारणांवर प्रतिबंधात्मक कार्य करतेतसेच समस्यांचे निवारणही करतेदैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य होतेत्याचबरोबर साधना करणार्‍या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नतीही होतेअशी महत्त्वपूर्ण माहिती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौड्रगाना किस्लौस्की यांनी सादर केलेल्या स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिसया संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’, या शोधनिबंधात मांडलीया शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉजयंत आठवलेतर सौकिस्लौस्की सहलेखिका आहेत२० आणि २१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत फोकस प्रिमियम हॉटेलग्डान्स्कपोलंड येथे ग्डान्स्क विद्यापिठाने आयोजित केलेल्या द्वितीय आंतरराष्ट्रीय इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्समध्ये हा शोधनिबंध मांडण्यात आला.

     सौकिस्लौस्की पुढे म्हणाल्या कीमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना परात्पर गुरु डॉआठवले यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनाच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर केली आहेया विश्‍वविद्यालयाच्या वतीने सूक्ष्म जगत आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम यांबाबतही संशोधन केले जातेअतिंद्रिय घटनांसंदर्भातील वस्तू आणि ध्वनिचित्रीकरण यांचा जगातील सर्वात मोठा साठा विश्‍वविद्यालयाकडे आहे.

    त्यानंतर सौकिस्लौस्की यांनी अतिंद्रिय कारणांमुळे पडणारी स्वप्ने आणि स्वप्नावस्था किंवा जागेपणी भासमान होणारी दृश्ये(Phantasms)’ या संदर्भातील त्यांचे संशोधन मांडलेहे संशोधन प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्रेतसेच स्पंदनशास्त्राचा अभ्यास यांच्या साहाय्याने केले आहेजीवनातील सर्व समस्यांची मूलभूत तीनच कारणे म्हणजेच शारीरिकमानसिक आणि आध्यात्मिक असतातहे या संशोधनातील प्रमुख सूत्र आहेप्रारब्ध हे आध्यात्मिक कारणांपैकी प्रथम कारण आहेआपल्या जीवनातील आपल्या नियंत्रणाबाहेरच्या घटना म्हणजे प्रारब्धदुसरे आध्यात्मिक कारण म्हणजे सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्तीतर अतृप्त मृत पूर्वजांचे लिंगदेहहे तिसरे आध्यात्मिक कारण आहेरात्री वाटणार्‍या अनामिक भीतीमागील (Night terrors) प्रमुख मूलभूत कारण मानसिक असतेमात्र भीतीदायक स्वप्नेझोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिसआणि झोपेत चालणेयांमागील मूलभूत कारण आध्यात्मिक असतेसूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती आणि अतृप्त मृत पूर्वजांचे लिंगदेह ही या व्याधींची मूलभूत कारणे असतात.

     एका आध्यात्मिक संशोधन केंद्रामध्ये ४४ जणांच्या केलेल्या सर्वेक्षणातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रेही त्यांनी मांडलीया सर्वेक्षणातील ८५ टक्के जणांनी सांगितले कीत्यांनी आध्यात्मिक साधना चालू केल्यानंतर त्यांच्या स्लीप पॅरालिसिसची वारंवारता आणि तीव्रता वाढलीसर्वेक्षणातील ६५ टक्के जणांनी सांगितले कीत्यांना हा त्रास साधना सुरू केल्यानंतर चालू झालामात्र ते जसजशी साधना करत गेलेतशी या त्रासाची वारंवारता आणि तीव्रता कमी होत गेलीजेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक उन्नती घडवून आणणारी योग्य साधना चालू करतेतेव्हा सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती त्या व्यक्तीला साधनेपासून परावृत्त करण्यासाठी झोपेशी संबंधित व्याधींसारख्या अडचणी निर्माण करतातसाधारणतः ५० टक्के स्वप्ने पडण्यामागे सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्तींचा हात असतोभीतीदायक स्वप्नांच्या बाबतीत हा प्रभाव अजून अधिक असतोउर्वरित ५० टक्के स्वप्नांवर आपल्या अंतर्मनाचा प्रभाव असतो.

    शोधप्रबंधाच्या समारोपात सौकिस्लौस्की यांनी झोपेशी संबंधित व्याधींवर केलेल्या त्यांच्या विस्तृत संशोधनावर आधारित काही उपाय सांगितलेसर्वेक्षणातील ८० टक्के व्यक्तींनी सांगितले कीस्लीप पॅरालिसिसची तीव्रता कितीही जास्त असलीतरी त्यातून बाहेर पडण्यात त्यांच्या दैनंदिन साधनेच्या प्रयत्नांची सर्वाधिक मदत झालीनामजपामुळे स्लीप पॅरालिसिसमधून पटकन बाहेर येता आलेअसे सर्वांनीच सांगितलेयासाठी दर दिवशी किमान २ घंटे नामजप करणे आवश्यक असतेसमस्येची तीव्रता अधिक असल्यास नामजप अधिक कालावधी करायला हवाप्रत्यक्ष स्लीप पॅरालिसिस झाले असतांना देवाला प्रार्थना करणे आणि नामजप यांमुळे त्यातून लवकर बाहेर पडता येतेस्लीप पॅरालिसिस होणार असल्याची चाहूल लागताच नामजप चालू करणे किंवा असल्यास नामजप वाढवणे याचा लाभ होतो.