एस पी शुगरचा उद्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार ; गव्हानीत पडणार ऊसाची मोळी

0
1918
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथिल एस पी शुगर अँण्ड अँग्रो प्रा लि कारखान्याच्या या वर्षीच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या (शनिवार) माजी मंञी तथा विधान परीषदेचे आमदार सुरेश धस व आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे
धाराशिव साखर कारखानाचे माजी संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी गेल्या वर्षी अवघ्या सहाच महीन्यात कसबे तडवळे येथे १२५० मे टन क्षमता असलेल्या गुळपावडर कारखाना निर्मिती कारखाना उभा केला व पहीला गाळप हांगाम यशस्वीरीत्या पारा पाढला होता
गेल्या पाच सहा वर्षाच्या तुलनेत या वर्षी ऊसाच्या क्षेञात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे व या परीसरातील सर्वात विश्वासाचा व खाञीचा तेरणा कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना उस गाळपाचा मोठा प्रश्न होता माञ एस पी शुगर हा कारखाना चालु झाल्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांना खुप मोठा अधार मिळालेला आहे
एस पी शुगरचा बाँयलर आग्निप्रदीपन कार्यक्रम बुधवारी (ता १९) चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला,होता व उद्या गव्हानीमध्ये सुरेश धस व सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते प्रत्यक्षात उसाची मोळी टाकुन सुरवात करण्यात येणार आहे कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी हे राहणार आहेत तरी या कार्यक्रमसाठी हितचिंतक सभासदांनी उपस्थीत रहावे अहे आवाहन एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटिल यांनी केले आहे