अकोटात श्री’ च्या विसर्जनासाठी सुतगिरणीच्या प्रांगणात गणेशकुंड व्यवस्था*

0
1546

आकोट/ संतोष विणके

आकोट शहरातील गणपती विसर्जनासाठी स्थानिक हिवरखेड रोडवरील आकोट तालुका सहकारी सुतगिरणीच्या प्रांगणात गणेश विसर्जनासाठी गणेशकुंड स्थळ निमिर्ती करण्यात आली आहे.या विसर्जन स्थळी स्वच्छता ,निर्माल्य संकलन तथा पर्यावरणपूरक विसर्जन स्थळ ,पुरेशा पाणी व अनुषंगिक उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.अपुऱ्या पावासामुळं नदी नाल्यांना पाणी नाही.शहरात गणेश विसर्जनाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे गणेश भक्तांच्या मागणीनुसार नगरपरिषदेने ही व्यवस्था यंदा केली आहे. गेल्या वर्षी ही व्यवस्था पालीकेच्या वतीने ग्रामिण रुग्णालयाच्या मागे करण्यात आली होती.या व्यवस्थेमुळे पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.गणेश भक्तांनी व मंडळांनी गणपती विसर्जन याठिकाणी करुन पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे ,उपाध्यक्ष अबरार खाॕ,मुख्यअधिकारी प्रशांत रोडे यांनी केले आहे.आकोट शहरात गणेश विसर्जन हे दि.२४ सप्टेंबर ला होणार आहे.