सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना ! – अमेरिका

0
1570
सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना ! – अमेरिका
सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना ! – अमेरिका
Google search engine
Google search engine

 

नवी देहली – इस्लामिक स्टेट, तालिबान आणि अल-शबाब या आतंकवादी संघटनांनंतर सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या एका अहवालातून घोषित केले आहे. या अहवालामध्ये आतंकवादाने ग्रस्त आणि धोकादायक आतंकवादी संघटना अशी सूची देण्यात आली आहे. यात आतंकवादग्रस्त देशात सलग दुसर्‍या वर्षी भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर इराक पहिल्या आणि अफगाणिस्तान दुसर्‍या क्रमाकांवर आहे. वर्ष २०१५ मध्ये पाकिस्तान तिसर्‍या क्रमांकावर होता, असे म्हटले आहे.

या अहवालात मांडण्यात आलेली सूत्रे

१. मागील वर्षी जगभरात झालेल्या एकूण आतंकवादी आक्रमणांपैकी ५९ टक्के आक्रमणे केवळ ५ आशियाई देशांमध्ये झाल्याचे अमेरिकेच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या ५ देशांमध्ये इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि फिलिपिन्स यांचा समावेश आहे.

२. भारतातील ५३ टक्के आक्रमणामध्ये सीपीआय-माओवाद्यांचा हात असतो; मात्र वर्ष २०१६ आणि २०१७ मध्ये भारतातील माओवाद्यांची आक्रमणे न्यून झाली आहेत.

३. माओवाद्यांच्या आक्रमणांमध्ये मरणार्‍यांच्या संख्येत १६ टक्क्यांनी आणि घायाळ होणार्‍यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

४. जगभरात माओवाद्यांनी २९५, अल-शबाबने ३५३, तालिबानने ७०३ आणि इस्लामिक स्टेटने ८५७ आक्रमणे केली.

५. वर्ष २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात ठार झालेल्यांच्या संख्येत ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात वर्ष २०१७ मध्ये झालेल्या ८६० आतंकवादी आक्रमणात एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये २५ टक्के लोक मारले गेले आहेत.

६. वर्ष २०१७ मध्ये भारतातील जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्ये यांना आतंकवादाची झळ बसली अन् मध्य भारतात माओवाद्यांच्या हिंसाचाराचा फटका बसला.

७. भारतामध्ये होणार्‍या आतंकवादी आक्रमणांची योजना पाकिस्तानमधून आखली जाते आणि त्याला पाकच्या यंत्रणा अन् सैन्य यांचे प्रोत्साहन मिळते; मात्र पाकिस्तानमध्ये होणार्‍या आक्रमणांमध्ये भारताचा हात नसतो’, असे भारतीय सैन्यातील एका अधिकार्‍याने म्हटले.