अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मुळे कोदोरी गावाला जोडणारे रस्ते खड्डेमय सरपंच अतुल कडू यांच्या तक्रार तर त्या अवैध वाळू साठवणूक बाबत महसूल विभागाच्या भूमिका संशयास्पद

0
886
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मुळे कोदोरी गावाला जोडणारे रस्ते खड्डेमय सरपंच अतुल कडू यांच्या तक्रार तर त्या अवैध वाळू साठवणूक बाबत महसूल विभागाच्या भूमिका संशयास्पद
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मुळे कोदोरी गावाला जोडणारे रस्ते खड्डेमय सरपंच अतुल कडू यांच्या तक्रार तर त्या अवैध वाळू साठवणूक बाबत महसूल विभागाच्या भूमिका संशयास्पद
Google search engine
Google search engine

अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मुळे कोदोरी गावाला जोडणारे रस्ते खड्डेमय
सरपंच अतुल कडू यांच्या तक्रार तर त्या अवैध वाळू साठवणूक बाबत महसूल विभागाच्या भूमिका संशयास्पद

चांदूर बाजार:-प्रतिनिधी

मागील 15 दिवसापासून चांदुर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी ला उधाण आले आहे.त्यात कोदोरी या ठिकाणी वाळू घाट बाहेर असलेल्या 5 ट्रॉली भरून असलेली वाळू आणि जागोजागी लागले असलेले ढीग यावर अध्यपही कोणतीच कार्यवाही झाली नाही.त्यामुळे चांदुर बाजार तहसील कार्यालय मधील महसूल विभागाच्या भूमिका संशयास्पद दिसत आहे.त्याच्या या भूमिकेमुळेच रेती तस्करी चांदुर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव आणि शिरजगाव कसबा या महसूल मंडळ मधील वाळू घाट नवीन हऱ्यास होण्या आधीच रिकामी करण्याचा वाळू तस्कर याचे उद्देश दिसत आहे.मात्र याना तहसिल कार्यलाय,मंडळ अधिकारी,तलाठी,कोतवाल यांचा कडून पाठराखण होते असल्याचे दिसत आहे.

.तसेच चांदुर बाजार तालुक्यातील वाळू घाट मधून वाळू ची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे या ठिकाणीवरून वाळू तस्करी सुरू असल्याचे दिसत आहे.या वाळू घाट मधून अवैध रित्या वाळूची तस्करी होत असल्याने चांदुर बाजार -जसापूर-कोदोरी हा रस्ता खड्डेमय झाले आहे.याची तक्रार सरपंच कोदोरी अतुल कडून यांनी तहसीलदार यांच्याकडे दिली आहे.मात्र 5ते 6 दिवसा पूर्वी कोदोरी वाळू घाटाच्या वर साठवून ठेवलेल्या 5 ट्रॉली आणि वाळू ढीग वर कोणतीच कार्यवाही झाली नाही.आणि त्या ट्रॉली मधून जोरात वाळूची वाहतूक सुरू झाली आहे.त्यामुळे आता या वाळू तस्करी वर कोण कार्यवाही करणार हा प्रश्न आहे.

“ज्याठिकाणी वरून ही वाळू तस्करी होते त्या ठिकाणी शाळा आहे.मात्र हे वाळू तस्कर सुसाट वेगाने वाहने चालवितात.त्यामुळं गावाला जोडणारे मुख्य रस्ते मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे.या वाळू तस्करी करणाऱ्या कार्यवाही झाली पाहिजे.”

ऍड.अतुल कडू सरपंच कोदोरी ग्रामपंचायत

(IP