श्री सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे पोपटखेड धरणावर निर्माल्य संकलन

0
810
श्री सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे पोपटखेड धरणावर निर्माल्य संकलन
श्री सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे पोपटखेड धरणावर निर्माल्य संकलन
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतिनिधी

शहरातील पुरातन तथा शतकोत्तर सातवे वर्ष(१०७) साजरे करणाऱ्या नरसिंग मंदिर पटांगणातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अनंत चतुर्दशीला पोपटखेड धरणावर निर्माल्य संकलन करण्यात आले. मंडळ गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवत असून गणेशभक्तांकडून विसर्जनस्थळी या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळतो.या वर्षी मंडळाने पोपटखेड धरणावर विसर्जनासाठी येणाऱ्या घरगुती तथा सार्वजनिक मंडळांकडून स्वेच्छेने निर्माल्य संकलन करण्यात आले असून जमा झालेल्या निर्माल्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे मंडळाचे वतीने सांगण्यात आले आहे.