बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा/ बेरोजगार युवक-युवतीसाठी रोजगाराचीसुवर्णसंधी: आ.अनिल कदम

1095
जाहिरात

समाधान भाऊसाहेब कोकाटे
निफाड तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने रोजगाराच्या शोधातील बेरोजगारांना योग्य रोजगार मिळवून देण्याकरिता राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे भरविण्याचे ठरविले आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ह्या नावाने हे रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय केला गेला आहे. तरी युवकांनी या संधी चा लाभ घ्यावा असे आवाहनआमदार अनिल कदम(अंदाज समिती प्रमुख महाराष्ट्र राज्य.) यांनी केले आहे.उद्दिष्ट्ये: बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट्य हे प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक औद्योगिक व वाणिज्यिक संस्थांमध्ये रोजगार मिळवण्याकरीता सहाय्य करणे तसेच स्थानिक औद्योगिक / वाणिज्यिक संस्था आणि बेरोजगार ह्यांच्यामधील दूरी कमी करण्याकरिता एका समान मंचाची स्थापना करणे हे आहे.ह्याकरिता बेरोजगार व्यक्ती व संस्थाचालक / मालक ह्यांच्या वापराकरिता एक संकेतस्थळ विकसित केले आहे . ह्या मेळाव्यांच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या भागातीलरोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन संभाव्य संस्था चालक / मालकांबरोबर थेट मुलाखतीद्वारे रोजगार मिळू शकेल, तसेच संस्था चालक / मालकांनाही योग्य मनुष्यबळ तात्काळ मिळू शकेल.बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये जिल्हास्तरीय /औद्योगिक क्षेत्रनिहाय एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन. नोंदणीकृतबेरोजगार आणि संस्था चालक / मालकांकरिता थेट परस्पर संवादाकरिता भेटण्याची जागा.योग्य उमेदवारांना तात्काळ रोजगाराची संधीइच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करिता संकेतस्थळ www. balasahebthackerayrojgarmelava.com ह्यात प्राप्त माहितीचे वर्गीकरण, पृथ:करण व त्या नुसार मार्गदर्शनसर्व रोजगार उत्सुक व्यक्तींची माहिती साठवून मेळाव्यात सहभागी न होऊ शकलेल्या संस्था चालक / मालकांसाठी उपलब्ध राहील, ज्याद्वारे त्यांना आपल्या आस्थापना / उद्योगांमध्ये नोकर भरती करता येईल..मेळाव्याच्या कालावधी दरम्यान सहभागी व्यक्तींकरिता कार्यशाळा / परिसंवाद / मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावाबेरोजगार युवक-युवतीसाठी रोजगाराची सुवर्णसंधीदि.२९ सप्टेबंर २०१८ कम्युनिटी हाँल,हिंदुस्तान एरोनाँटिक्स लिमिटेड ओझर

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।