कर्ज वसुलीकरीता तगादा लावणाऱ्या व महिलांना असभ्य वागणूक देणाऱ्या L&T मायक्रो फायनांन्स कंपनी विरोधात वरुड येथे आंदोलन

0
2004

Google search engine
Google search engine

वरुड :-

वरूड तालुका कर्ज वसुलीकरीता तगादा लावणाऱ्या व महिलांना असभ्य वागणूक देणाऱ्या L&T मायक्रो फायनांन्स कंपनी विरोधात आज वरुड शहरात आंदोलन करण्यात आले होते.

भाजयुमोचे श्री मनोजभाऊ माहुलकर यांचे प्रमुख नेतृत्वात l & T या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात असंख्य महिलांनी धडक दिली. त्यावेळी कंपनीच्या काही कर्मचारी यांनी कार्यालयातून पळ काढला. तर उपस्थित कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरण्यात आले. आजच्या या घटनेमुळे अवैध कर्ज वसुली करणाऱ्या व महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीचे धाबे दणाणले असून ग्रामीण भागातील महिलांचे मनोबल वाढले आहे.

या आंदोलनात भाजयुमो अमरावती जिल्हा उपाध्यक्ष श्री रविराजभाऊ पूरी, नगरसेवक श्री संतोषभाऊ निमघरे,आमनेर जिल्हा परिषद प्रमुख श्री संजय कोहले, नगरसेवक श्री प्रीतम अब्रूक,वरूड भाजयुमो प्रमुख श्री नीलेश अधव ,श्री गोलू मानकर , पवनी गावातील महिलांनी सहभाग घेतला.