अकोट शहरातील सायकलरिक्षा चालकांना ठाणेदार गजानन शेळकेंच्या हस्ते रेनकोटचे वाटप

0
1040
अकोट शहरातील सायकलरिक्षा चालकांना ठाणेदार गजानन शेळकेंच्या हस्ते रेनकोटचे वाटप
अकोट शहरातील सायकलरिक्षा चालकांना ठाणेदार गजानन शेळकेंच्या हस्ते रेनकोटचे वाटप
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी

अकोट शहरावरील संवेदनशीलतेचा डाग संपवायचा असेल तर सकारात्मक नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे. ठाणेदार गजानन शेळके अकोट शहराची ओळख हे संवेदनशील शहर म्हणून आहे या ठिकाणी अनेकदा दंगली झाल्या आहेत शहरावरील संवेदनशीलतेचा डाग संपवायचा असेल तर सकारात्मक विचारांच्या नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ठाणेदार गजानन शेळके यांनी केले ते स्थानिक डॉ.इक्बाल लायब्ररी येथे दिनांक 22 सप्टेंबर रोजी आयोजीत रेनकोट वाटप व सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

सेवाभावी संस्था रजीयाबानो मेमोरियल सोसायटी आणि अब्दुल कादर इनामदार सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता,कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ नागरिक अब्दुल जलील इनामदार होते मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जमात-ए-इस्लामी हिंद चे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. मोहम्मद इब्राहिम खान, आर्किटेक्ट प्रा. नवनीत लाखोटीया, बालरोग तज्ञ डॉ.नितीन इंगळे पाटील , नगरसेवक मंगेश लोणकर, नगरपालिका सभापती मनीष कराळे भाजप शहराध्यक्ष कनक कोटक ,न पा उपाध्यक्षअबरार खाॕ,अब्दुल कादर इनामदार सोसायटीचे अध्यक्ष मंमद खालीद इनामदार पत्रकार जफरखान रजिया बानू मेमोरिअल सोसायटीचे सचिव वसीम अहमद खान उपाध्यक्ष रफिक टेलर आणि मान्यवर उपस्थित होते

यावेळी शहराची ट्राफिक व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सिंग ठाकूर व पोलिसांना सोनू चौकात स्वखर्चाने पोलीस चौकी देणारे व्यापारी सुदाम राजदे शिवाजी महाराज चौकात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेंच व चौकी देणारे गोंडचर तसेच हज यात्रा करून आलेले मोहम्मद आसिफ मिस्त्री आणि दीक्षा ॲप तयार करण्यासाठी मोलाची कामगिरी करणारे नगरपालिका शिक्षक यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यानंतर शहरातील तीन चाकी रिक्षा चालक यांना दोन्ही संस्थांच्या वतीने निशुल्क रेनकोट वाटप करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकूण 16 रिक्षाचालकांना रेनकोट वाटण्यात आले यावेळी बोलतांना इब्राहीमखान यांनी रिक्षाचालकांना व्यसनांपासून दूर राहून आपले आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शर्मा यांनी केले प्रास्ताविक पत्रकार वसीम अहमद खान यांनी केले यावेळी शहरातील गणमान्य व्यक्ती शिक्षक रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले.