मुंबई – आमदार श्री बच्चू कडू मंत्रालयातील एका अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. महापरिक्षा पोर्टलच्या कारभाराविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांना प्रसाद पी या अधिकाऱ्याने मुजोरीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडूनी अधिकाऱ्यावर लॅपटाॅप भिरकावला.महापरिक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराबाबत बुधवारी आमदार बच्चु कडू आणि प्रहार विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी मंत्रालयात गेले होते. मात्र यावेळी प्रसाद यांनी आमदारांना करता हु… देखुंगा…आप को क्यू बतावू… अशा भाषेत उत्तरे दिली. त्यामुळे बच्चू कडू संतापले दरम्यान, दोन दिवसात कारवाई न केल्यास बघ काय करतो असा इशाराही बच्चू कडूंनी त्या अधिकाऱ्याला दिला.