पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. असे आपण म्हणतो मग शासनाचा फायदा फक्त अधिस्विकृती धारक पत्रकारानाच का मिळतो सर्व अधिकृत पत्रकारांना का नाही ?

0
2009
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

पत्रकार हा लहान असो किंवा मोठा काम एकच आहे. मग अधिस्वीकृती धारक पत्रकारांनाच सुविधा का मिळाव्यात सर्व पत्रकारांना शासकीय सुविधांचा लाभ मिळायला हवा. सर्व पत्रकारांना समान दर्जा दिला गेला पाहिजे. लेखणी समान तर दर्जा समान हवाय. शासकीय दरबारी हा भेदभाव कश्यासाठी. आज प्रत्येक गावातील खेड्यापाड्यातील कानाकोपर्यातील बातमी पेपर मध्ये छापून येते ती काय अधिस्वीकृती धारक पत्रकार देतात का. ती बातमी येत असते स्वतः च्या खिशातील पेट्रोल टाकून बिनपगारी काम करणाऱ्या एका पत्रकारामुळे पत्रकार संघटनांनी खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. असे आपण म्हणतो मग या लोकशाहीचा डोलारा केवळ अधिस्विकृती धारक पत्रकाराच वाहतात का?
सामाजिक हितासाठी जनतेच्या समस्या वर्तमान पत्रातून निरंतर मांडून जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकाराला पगार मिळतो का? गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा केवळ अधिस्विकृती धारक पत्रकारच फोडतात का? न्याय हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात केवळ अधिस्विकृती धारक पत्रकारांचाच समावेश असतो का ? आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची दहा, पंधरा, वीस, तीस वर्षे विना वेतन इमानेइतबारे पत्रकारितेत व्यतीत करणाऱ्या पत्रकारांच्या पदरात काय पडते ? काही नाही. पत्रकार हा पत्रकार असतो मग त्या पत्रकार वर्गातील केवळ मुठभर अधिस्विकृती धारक पत्रकारानांच सरकारी सुविधांचा लाभ देणे योग्य आहे का ? असे करुन शासन इतर सर्व पत्रकारांचा अपमान करत आहे. असे मला वाटते.
पत्रकारितेच्या माध्यमातुन आपण समाजासाठी झटतो, दिवस -रात्र , ऊन, पाऊस,वारा कसलीच परवा न करता आपल्या लेखन-कौशल्याद्वारे ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे.त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी आपण रात्र आणि दिवस झटत असतो.
पगार नाही पाणी …आपल घर कशावर चालतय हो ? कुणाला आहे का चिंता आपली
३०-४० किलो मिटर वर बातमी करायची आहे मग पेट्रोल खर्च कुणी करायचं आपणच ना?
पत्रकारालाही कुटूंब आहे , कुणी त्याची चिंता करत ?
असे अनेक पत्रकाराचे प्रश्न आज उभे आहे ते प्रश्न सरकारने पूर्ण करावे.