अकोट पोस्ट कार्यालयात “स्वच्छता हीच सेवा” मोहीम

0
675
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी –

स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत आकोट शहरात *स्वच्छता हीच सेवा* ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मोहीमेत आकोट शहरवासियांनी सहभागी होवून स्वच्छ व सुंदर शहरासाठी कृतसंकल्प व्हावे.असे कळकळीचे आवाहन पोस्टमास्टर के.एस.नायक यांनी केले.
ते अकोट पोस्ट कार्यालयात “स्वच्छता हीच सेवा” मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
आकोट शहरात दि.१५ सप्टेंबर ते २आक्टोंबर दरम्यान स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी आकोट पोस्ट मास्टर हस्ते “स्वच्छता ही सेवा” पत्रके वाटण्यात आली.

तसेच यावेळी सेवा अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहीती देवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती उपस्थीतांनी केली. यावेळी मुख्य पोस्ट मास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सकिँल मुंबई चे पत्रक वाटण्यात आले.
हि मोहीम यशस्वी करण्यासाठी सचिन नेसनेस्कार, सौ.शितल देशमुख, अजय भगत व कर्मचारी वर्ग यांनी सहभागी झाले व सहकार्य केले.