मनसेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल लवकरच करणार मराठवाडा दौरा

0
928

मनसेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल लवकरच करणार मराठवाडा दौरा

उस्मानाबाद – मनसेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल या सध्या दुष्काळात होरपळत आसलेल्या शेतकर्यांना भेटून त्यांच्या हक्कासाठी शासनाला जागे करण्यासाठी दसरा महोत्सवानंतर तुळजापूर येथून सरकारच्या नावावर जागरण गोंधळ घालून मराठवाडा दौर्याची सुरवात करण्यात येणार आहे
सध्या मराठवड्यात पाऊस कमी पडल्यामुळे शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन हे पूर्ण वाया गेले आहे ,जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याचा भेडसवणारा प्रश्न , मजुरांना मजुरी मिळत नसल्यामुळे मजुरावर गाव सोडण्याची आलेली वेळ , अशा विषयावर शेतकरी ,मजुर ,व्यापारी यांच्याशी मनसेच्या धडाडीच्या महिला सेना सचिव मास्टरमाईंड मिनाताई पाटिल या कळंब तालुक्यातील बरमाची वाडी ,वाघोली, वाठवडा या भागातील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत व त्यांच्या व्यथा त्यांच्यावर आलेले संकट हे दुर करण्यासाठी या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ घालून मराठवाडा दौरा करणार आसल्याची माहिती

मनसेच्या धडाडिच्या नेत्या मिनाताई पाटिल

मिनाताई पाटिल यांनी आमच्याशी दुरध्वनीवरून बोलताना सांगीतली तसेच या दौर्यात मराठवाड्यातील मनसेच्या महिला पदाधिकारी / सर्व पदाधिकारी कार्यकरत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मिनाताई पाटिल यांनी केले आहे