‘एसएफआय’ च्यावतीने शहीद भगतसिंग यांना जन्मदिनी अभिवादन

0
795
Google search engine
Google search engine

जिल्हाभरात २८ सप्टें ते ७ ऑक्टो दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

बीड (ता.२८) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने शहीद भगतसिंग यांना १११ व्या जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आज येथील बलभीम महाविद्यालय परिसरात ‘एसएफआय’ तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील विविध शहरे व गावांमध्ये आज अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

२८ सप्टेंबर हा महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा जन्मदिन साजरा करण्यात येतो. ‘एसएफआय’ जिल्हा कामिटी तर्फे ‘शहीद भगतसिंग जन्मोत्सव, २०१८’ या शिर्षकाखाली हा जन्मदिन जिल्हाभरात २८ सप्टें ते ७ ऑक्टो दरम्यान विविध कार्यक्रम घेऊन साजरा होत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, शाळा – महाविद्यालयात व्याख्याने, विविध शालेय व महाविद्यालयीन स्पर्धा, अभिवादन सभा, संघटनेच्या शाखांचे उद्घाटन अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या विविधांगी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ‘एसएफआय’ जिल्हा कमिटीने केले आहे.

आज बलभीम महाविद्यालयात कार्यक्रमाला ‘एसएफआय’ चे राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव रोहिदास जाधव, राम नवले, अंकुश गवळी, रवी राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण काशीद, शिवा चव्हाण, राहुल राठोड, सुदाम आडे, जुनेद शेख, यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.