चांदुर बाजार तालुक्यात वाळू तस्करी ला उधाण तर तहसिल कार्यलाय मधील अधिकारी यांच्या कडून वाळू माफिया मूक संमती,पोलिस विभाग करणार का कार्यवाही?

0
1532

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी पात्र आहे.तालुक्यातून पूर्णा, मेघा नदीचे मोठे पात्र आहे.जितके पात्र जास्त तितके वाळू चा उपसा करणारे अधिक.चांदुर बाजार तालुक्यात मागील 15 दिवसापासून अधिक जास्त प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. अवैध पणे वाळू वाहतूक करणाऱ्या या वाळू माफिया याना तहसिल कार्यलाय चांदुर बाजार मधील अधिकारी यांचा मूक पाठिंबा असल्याचे दिसत आहे.तर तिकडे प्रभारी तहसीलदार नीलिमा मते “आम्ही होत असलेल्या वाळू लवकरच आळा घालणार असल्याचे सांगितले.” मात्र त्याच्या या शब्दाला चांदुर बाजार तालुक्यात वाळू तस्कर कडून तिरंजली वाहिली जात असल्याचे दिसत आहे.

चांदुर बाजार तालुक्यात नियोजन करून वाळूचा अवैध पणे वाळू वाहतूक सुरू आहे.हे वाळू तस्कर वाळू घाटातून नियोजन करून वाळूचा उपसा करतात.दिवसभर घाटाच्या बाहेर वाळू साठवली जाते.त्यानंतर रात्रीला किंवा दिवसाला त्या वाळू भरलेल्या ट्रॉली ची वाहतूक छुप्या मार्गानी केले जाते.या मध्ये वाळू ची तस्करी होताना एक जण त्या वाहतूक असलेल्या वाळूच्या ट्रॉली च्या समोर दुसरा त्याचा मागे मोटरसायकल ने असतो तर काही जण ब्राह्मणवाडा थडी टी पॉइंट वर असतात.महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांचा कर्मचारी रोडने येताना जरी दिसला तर थेट वाहतूक होत असलेल्या वाळूचा त्या ट्रॅक्टर च्या समोर मोटार सायकल स्वार याला भ्रमणध्वनी वरून संपर्क करून सतर्क केले जाते.

दुसरा प्रकार अवैध वाळूची वाहतूक होत असताना एक जण मोटरसायकल स्वार ज्या ठिकाणी वाळू टाकायची आहे.तिथपर्यंत रस्ता पहिले पाहून येतो मग वाळूची प्रवास सुरु होतो.आणि वाळूची डिलिव्हरी केली जाते.

पोलिस विभाग वर सुद्धा या माफिया चे लक्ष्य असतात ते फिक्स पॉइंट वर उभे राहून पोलिसांवर लक्ष्य ठेवतात.पोलीस विभाग यांनी सुद्धा वाळू माफिया यांच्या बरेच कार्यवाही केल्या.मात्र या 15 दिवसाच्या कालावधी मध्ये महसूल विभाग आणि पोलिस विभाग होणाऱ्या या वाळू तस्करी कडे अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे.तर तहसिल मधील अधिकारी यांचा होत असलेल्या वाळू ला मुक्की संमती दर्शवित आहे..

विक्री झालेल्या वाळू घाट वैधता येत्या 2 दिवसात संपणार आहे.त्यामुळे वाळू तस्कर हे मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करीत आहे.महसूल विभाग पथक तयार करण्यात आले.मात्र अजून पर्यंत त्यांनी ठोस अशी कार्यवाही नाही केली.त्यामुळे पथक फक्त नावालाच असल्याचे दिसत आहे.तर या सर्व प्रकरणावर पोलीस विभाग कार्यवाही करतील का अशी चर्चा चांदुर बाजार तालुक्यात रंगात आहे.