सुरळी येथील गणेशोत्सव मंडळाला आदर्श पुस्काराने सन्मानित

0
1020
Google search engine
Google search engine

सुरळी येथील गणेशोत्सव मंडळाला आदर्श पुस्काराने सन्मानित

ता.प्रतिनिधी /
चांदूर बाजार :-
ब्राम्हणवाडा थंडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम सुरळी येथे दरवर्षी प्रमाणे एक गाव एक गणपती ची स्थापन करण्यात आली, येथील बाल गणेशोत्सव मंडळाने कायदा व सुव्यवस्था राखून शांततेच्या मार्गाने गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालमुक्त व डी जे मुक्त वातावरणात गावाच्या मध्ये भागातून दिंडी आणि भजन शोभायात्रा काढण्यात आली, तसेच गणेशोत्सव मंडळाने शांततेत पार पाडल्याने पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थंडी च्या वतीने बाल गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते यांचा प्रशस्तीपत्र शाल श्री फळ देऊन ठाणेदार सचिन परदेशी साहेब यांच्या हस्ते सत्कार गौरवविण्यात आले ,
यावेळी मा उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपुर श्री अब्दागीरे  ,पोलीस निरीक्षक सचिन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मस्कर , यांनी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते ना या कार्यक्रमात मार्गदर्शन केले, तसेच श्री बाल गणेश मंडळ चे अध्यक्ष प्रविण पडोळे, उपाध्यक्ष वैभव बुगुल, सचिव अंकुश पडोळे, कोषाध्यक्ष गजानन उभाड , तंटामुक्त अध्यक्ष नितीन गुळधे, विनोद इंगळे, अमोल इंगळे, सुयित गांजरे, शिवचरण पाटणकर, प्रमोद अटाळकर, विनोद जरूदे अभिजित भोंडे, शुभम विघे, अंकुश बुगुल, तुषार देशमुख तसेच पदाधिकारी – कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,