विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – उमाकांत मिटकर

0
960
Google search engine
Google search engine

विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – उमाकांत मिटकर

उस्मानाबाद – विद्यार्थ्यांची प्राथमिक अवस्था ही दगडासारखी असते त्याला शिक्षक प्राध्यापकांनी आकार देऊन विविध कलागुणांनी घडवून देवळात बसवुन तुम्ही मूर्तिकार बना असे मत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य उमाकांत मिटकर यांनी व्यक्त केलेरोटरी क्लब आणि एकता फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे रविवारी सकाळी अकरा वाजता आयोजित जिल्हास्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत व वृक्षाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जनता बॅंकेचे चेअरमन प्रा. गजानन धरणे व प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, उमाकांत मिटकर ,अभिजित पवार ,अमित कदम, रणजित रणदिवे, विशाल थोरात व आभिलाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होतीस्वतः शिक्षक म्हणून काम करत असताना पालावरच्या शाळेची जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणांची गोडी निर्माण व्हावी म्हणुन विद्यार्थ्यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे मत यावेळी उमाकांत मिटकर यांनी व्यक्त केले.शिक्षकांचा राष्ट्र उभारणीत महत्वाचा सहभाग असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापनाबरोबरच स्पर्धा परीक्षा, क्रीडा आदी क्षेत्रात विद्यार्थी परिपूर्ण घडवुन देशाचा उत्तम नागरिक बनवावा असे मत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यावर लहानपणी चांगले संस्कार दिले तर तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहात नाही. रोटरी क्लब आणि एकता फाउंडेशन यांनी शिक्षकांसोबतच वाँटर कप स्पर्धेतील उस्मानाबाद जिल्ह्यातील पारितोषिक विजेत्या गावांचा सत्कार करून एक चांगला पायंडा निर्माण केले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलेशिक्षक हा समाजाचा नैतिक आवाज असून शिक्षकाकडे ज्ञान व नैतिकता या दोन शक्ती असतात असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गजानन धरणे यांनी यावेळी व्यक्त केले.पुढे बोलताना म्हणाले आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन व्हावे, कौतुक व्हावे म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून प्रत्येक शिक्षकाने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा यासारखे काम करावे अशी आशा ही यावेळी व्यक्त केली. शिक्षणासोबतच गावच्या विकासासाठी शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यामुळे लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेकार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरी क्लब अध्यक्ष अभिजित पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटरी क्लब सचिव रणजित रणदिवे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता फाउंडेशनचे सचिव आभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने रोटरी क्लब, एकता फाउंडेशनचे पदाधिकारी,सदस्य व जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब व एकता फाऊंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.यावेळी डॉ. यादगिरे प्रकाश, कांबळे तात्याबा, गायकवाड रवींद्र,पवार कुंडलिक, खोबरे दत्तात्रय,क्षिरसागर अनिल, जाधवर प्रशांत, अंधारे अमोल,वाघ शेषनाथ, घोडके मनोहर, चौधरी दिलीप, घाडगे हनुमंत, पाटील उदयसिंह, रुदके साईनाथ, डाँ.सूर्यवंशी दीपक, धोंगडे संजय, डाँ.स्वामी शिला,मिटकर प्रणिता, स्वामी मंजुषा, देशमुख रावसाहेब, डाँ.वायचळ विनोदकुमार व प्रा.पापडे अशोक या 22 शिक्षकांचा शाल, बुके, सन्मानचिन्ह व सन्मानपञ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर वाँटरकप स्पर्धेतील उस्मानाबाद जिल्ह्यातील पारितोषिक विजेत्या उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ, कावलदरा, दाऊतपुर भुम तालुक्यातील पाठसांगवी, पाथरुड कळंब तालुक्यातील करंजकल्ला, पिंपरी (शि) व परांडा तालुक्यातील लंगोटवाडी व सक्करवाडी या गावाचा विशेष सन्मान करण्यात आला.