*कत्तली करिता जाणारी गोवंशाची 36 जनावरे आणि पाच पिकअप टेम्पो जप्त-वरुड पोलीसांची धडक  कारवाही*

0
860

वरुड(अतुल काळे)-

वरुड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्या वरून आमनेर जवळ दबा घालून बसलेल्या पोलिसांनी पाच पिकअप टेम्पो मधून 36 गोवंशाची जनावरे पकडली. या कारवाईत 4 लक्ष 68 हजार रुपयांची जनावरे आणि 20 लक्ष रुपयांची पाच पिकअप टेम्पो असा 24 लक्ष 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमनेर येथील रहिवासी राजा उर्फ अश्फाक अब्दुल कदिर व नाअशाद नामक व्यक्ती हे गोवंशाची जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती वरुड पोलिसांना मिळाली या वरून वरुड पोलिसांनी आमनेर येथे नाकाबंदी केली . दरम्यान वाहन दाबविण्याचा इशारा पोलिसांनी करताच पळून जाण्याचा प्रयत्न केला गेला.यावेळी पाठलाग केला असता वाहन चालक वाहन सोडून अंधारात पळून गेला.पाच पिकअप टेम्पो ची तपासणी केली असता गोवंशाची 36 जनावरे आढळून आली .या वरून पंचसमक्ष जप्ती पंचनामे करून 4 लाख 68 हजार रुपयांची जनावरे आणि पाच पिकअप टेम्पो 20 लक्ष रुपये असे 24 लक्ष 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कलम 5(अ),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सह कलम 11 (क)(ड)प्राण्यांना निर्दयतेने वागण्याच्या कलम सह 83/177,मोटार वाहन कायदा व 119 मुंबई पोलीस कायद्या प्रमाणे राजा उर्फ अश्फाक अब्दुल कदिर रा.आमनेर तसेच वाहन चालक,मालक विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध वरुड पोलीस घेत आहे.पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुजाडे, शिरेकर,उमेश ढेवले, गजानन गिरी,शेषराव कोकरे,संदीप कोल्हे सह आदी करीत आहे.