विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू टिटवा येथील घटना

0
673
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (ता. प्र. )
   आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसागणिक अनेक घटना घडत असून अपघात, सर्पदंश अशा एक नव्हे तर अनेक घटनांनी मृत्यू होत असताना चांदूर रेल्वे तालुक्यातील टिटवा येथील एका विवाहित महिलेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
     प्राप्त माहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील टिटवा पुनर्वसन येथील शेडमध्ये बोदडे कुटुंब राहत असून १ ऑक्‍टोबरच्या रात्री ११  वाजता मैनाबाई योगीराज बोदडे (वय ४३ वर्षे) या लघुशंकेसाठी ऊठल्या असता विषारी सापाने त्यांना दंश केले. परंतु त्यांना सुरुवातीला काही जाणवले नाही. मात्र काही वेळाने त्यांना डोळ्यांनी दिसणे बंद झाल्यामुळे सर्वांची खात्री झाली की, त्यांना सर्पदंश झाला. त्यामुळे मैनाबाईंना तातडीने अमरावती येथे नेण्यात आले. परंतु त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
      त्यांच्या मागे पती, दोन मुली, एक मुलगा असा भरपूर परिवार आहे. या अति गरीब कुटुंबाला शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.