रस्त्यावरील झाडांची कटाई केलेला लाकूड जप्त; सा बां विभाग व ब्राह्मणवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन आरोपींना अटक

0
791
Google search engine
Google search engine

रस्त्यावरील झाडांची कटाई केलेला लाकूड जप्त;
सा बां विभाग व ब्राह्मणवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई;
दोन आरोपींना अटक

चांदूर बाजार -प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ब्राह्मणवाडा – घाटलाडकी मार्गावर बांधकाम विभागाच्या हद्दीतील हिरव्या झाडांची कत्तल केली जात आहे. या बाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी यांना मिळाली. सदर कटाई करण्यात आलेली झाडे स्थानिक संत्रा मंडी मागे खुल्या जागेत लपवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावर अभियंता चौधरी यांनी ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून कटाई करण्यात लाकूड जप्त केले. तर झाडांची कत्तल करणारे आरोपींना पोलिसांनी अवघ्या पंधरा मिनिटातच अटक केली.
शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक , माजी नगराध्यक्ष अब्दुल रहमान शेख इब्राहिम यांच्या लेआऊटमध्ये असलेल्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या संतरा मंडी मागे चोरट्यांनी अवैधरित्या कटाई करून आनलेले लाकूड कटाई करून ठेवले होते. याची कुणकुण उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी यांना लागली. तालुक्यातील ब्राह्मणवाडा घाटलाडकी या मार्गावर वनी गावालगत रस्त्याच्या कडेवर असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकीचे हिरव्या झाडांची कत्तल सातत्याने रानकसई तर्फे केली जात आहे. कटाई केलेला हा लाकूड रातोरात दक्षिण भारतात पाठविल्या जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याला मिळाली. तर काही लाकूड स्थानिक आरामशीन वरच कटाई करण्यात येत असल्याचे कळते.
अभियंता निलेश चौधरी यांनी याबाबत स्थानिक महसूल प्रशासन, वनाधिकारी व ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनला अनेकदा लेखी तक्रारी केल्या. परंतु मुख्य रस्त्यालगत होत असलेली हिरव्या झाडांची कत्तल ही आमच्या विभागा अंतर्गत येत नाही. असे म्हणत सर्वच विभागणी झटकली. अखेर अभियंता निलेश चौधरी यांनी स्वतः रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत पाळत ठेऊन या अवैध वृक्ष कटाई चा छला लावला. यांनी 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी वनी गावालगतच्या चार झाडांची कटाई झाले असल्याचे निदर्शनास येताच संपूर्ण परिसर पिंजून काढला. अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास कापलेली झाडे चांदूर बाजार शहरालगत असलेल्या संत्रा मंडी मागील खुल्या जागेत ठेवण्यात आले असल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती निलेश चौधरी यांनी तत्काळ ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन परदेशी याना दूरध्वनीवरून दिली. काही मिनिटातच ठाणेदार स्वतः घटनास्थळी पोहोचून सदर माल व कटाई करणाऱ्या रानकसाई चा शोध घेणे सुरू केले. अवघ्या पंधरा मिनिटातच ठाणेदार परदेशी व खुपिया वीरेंद्र अमृतकर यांनी निरनिराळ्या ठिकाणावरून दोन आरोपींना अटक केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी यांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील रानकसाईचे धाबे दणाणले आहे.