शेगांव नगरपरिषदेत सत्तेतील भाजपाने भाजली स्वतःच्या मतांची भाकर….?

0
1420

*शेगांव नगरपरिषदेत सत्तेतील भाजपाने भाजली स्वतःच्या मतांची भाकर….?*
शेगांव:- शेगांव शहरात भरपुन वर्षा पासून रेंगाळत असलेले प्रश्न म्हणजे मोदी नगर वासियाच्या जागा कायम स्वरुपी नावे कऱण्याबाबतचा, याची दशा अशी की कोणीही या प्रश्ना कडे गांभीर्याने पाहत नव्हते, अनेक सरकार आली व गेलीत परंतु मोदी नगराचा प्रश्न मात्र प्रलंबीतच…

या परिसरातील लोकांनी यासाठी जीवाचे प्राण केले नेते मंडळी असो की गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणचे गावातील असे व्यक्ती की ज्यांची मजल सरकर पर्यंत आहे पण कोणी ही मोदी नगर वासीयांकडे डोळसपणे पहले नाही व याला कोणीही पूर्ण विराम देऊ शकले नाही. भाजपची सत्ता केंद्राच्या बरोबर राज्यात ही आली किंबहुना भाजपा सरकारला शेगांवच्या जनतेने भरभरून मत दिलीत आणि योगायोगाने शेगांव शहरात सुद्धा भाजपची सत्ता आली. आता तरी जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास जनतेच्या मनात होता पण इथे सुद्धा जनतेला मिळलीती फक्त आश्वासनचं… नगरपरिषद मध्ये भाजपा सत्ता स्थापन करून दीड वर्ष झाला तरीही स्थानिक जनता आपला रेटा धरून होती या मार्गाने नाही तर त्या मार्गाने शेवटी मोदी नगर वासीयांनी न्यायालयाचे दार ठोठावले आणि आपलं गाऱ्हाणं न्यायदेवतेच्या दारी मांडलं !

नगर परिषद मध्ये दीड वर्षांपासून कार्यरत असलेली भाजपा सरकार मधले प्रतिनिधींना मोदी नगर वासीयांचा आवाज कानी पडतच नसावा या कारणाने विपक्षात असलेल्या नगरसेवक यांनी या प्रश्नाचा पाठपुरावठा करत आपण ज्यांच्या मतावर निवडून आलो त्यांच्या प्रश्नाला खंबीरपणे मांडत नगर परिषद मध्ये रेटा लावून ठेवला व नंतर हे प्रकरण बैठकीत घ्यायला लावले. नगरपरिषदेत स्थित भाजपा सत्ताधाऱ्यांनी कुठे तरी फुल न फुलाची पाखळी दिली ठराव पारित झाला हे खरे… खरं तर भाजपा सत्ताधाऱ्यांना ठराव घेण्याकरिता भागपडणारे मोदी नगर वासी आणि ‘ एक ‘ पत्र…
शेगांव नगरपरिषदेला एस,डी,ओ कार्यालयाकडून एक पत्र आले त्या पत्रात मोदी नगर वासीयांच्या जागेचा उल्लेख पाहायला मिळतो त्यात न.प.ला या जागे बद्दल कार्यपूर्तीचा अहवाल करून कळवावे असा निकष येतो म्हणून कदाचित भाजपा ने ठराव मंजूर केला असावा शेवटी पत्राच्या धकापोटी का असेना ठराव संमत झाला असो…

नगरपरिषदेत ठराव पारित झाल्यावर तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून सत्ताधारी नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्या समारंभात नागरिकांची कूच-बूच सुरू होती, की निवडून आल्या नंतर पहिल्या वर्षात जर हा ठराव भाजपा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला असता किंबहुना पारित केला असता तर न्यायालयीन प्रकरणात नागरिकांना मदत झाली असती.
शेवटी भाजपच्या सत्तेने येन निवडणुकीच्या तोंडावर आपली भाकर भाजली की काय असा सवाल ही जनता विचारात आहे तरी ही “ज्याच्या कडे संघाची दोर त्यासी कसला घोर” असेच म्हणावे लागेल.
याचा अर्थ असा की या सर्वांचे श्रेय फक्त मोदी नगर वासीयांचे आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.