उस्मानाबादच्या बांधकाम विभागाचा अजब कारभार ; कोंड तावरजखेडा डांबरी रसत्यावरील खड्डे काळी माती टाकून बुजवले

0
992

हुकमत मुलाणी , मो-9623261000

उस्मानाबाद- उस्मानाबादच्या बांधकाम विभागाचा अजब कारभार ; कोंड तावरजखेडा डांबरी रसत्यावरील खड्ड्यात टाकली काळी माती

उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील कोंड ते तावरजखेडा जाणार्या डांबरी रसत्यावरील खड्डे चक्क काळी माती टाकून बुजवल्यामुळे पून्हा बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे कोंड तावरजखेडा जाणारा रस्ता हा डांबरी रस्ता आहे परंतू कोंड ते राजाभाऊ गयानदेव भोसले यांच्या शेतापर्यंत रस्ता करण्यात आला होता परंतू तोही रस्ता मोठ्या आकाराची खडी टाकून ओबडधोबड खडीचे डांबरीकरण करून तोही रस्ता अर्धवटच सोडला होता काही दिवसापूर्वी त्या रसत्यावरील खड्डे थातरमतर खडी टाकून त्या खडीला थोड डांबर टाकले तर काही खड्यात तर कोरडी खडी व वरून चूरम्याला डांबर लावले होते हा प्रकार कोंड येथील पत्रकार हुकमत मुलाणी यांनी ते काम चालू आसताना त्या खड्यातील टाकलेले मटेरीयल काढुन दाखवाले होते तर कामावरील सुपरवाझरची बोलती बंद झाली होती त्यानंतर काम बंद केले होते परंतू गावातील काही तुटाळ लहासर लोकांनी काम सुरु करण्यास सांगीतले होते त्यानंतर एका आठवड्यातच ते रसत्यावरील बुजवलेले खड्डे उघडे पडले त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत बर्याच वाहनांचे पाटे तुटले आहेत ,बर्याच वाहनांचे टायर फुटले आहेत , खड्यात बस आदळून प्रवाशांचे मणके मोकळे झाले आहेत आणि आज तर चक्क हे खड्डे बुजवण्यासाठी काळ्या मातीचाच वापर केला आहे रसत्याच्या कडेची झूडपेही तसेच आहेत आद्यापही काढलेले नाहीत या बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढतात का काय असा सवाल वाहन धारकाकडून उपस्थीत केला जात आहे संबधीत कर्मचारी अधिकारी यांनी उस्मानाबाद च्या कार्याकारी अभियंत्याला मलिदा दिला असावा त्यामुळे तर या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे आता या खड्यात काळी माती टाकल्यामुळे त्यावर पाणी पडले कि लगेच वाहने स्लिप होऊन अपघात होतात त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार हे संबंधीत अधिकारी व कार्यकारी अभियंते यांना का धरण्यात येऊ नये ?