मनसेच्या माहिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल यांनी मुलींच्या हस्ते मशाल पेटवून नवरात्र महोत्सवाची केली सुरवात

0
849
Google search engine
Google search engine

मनसेच्या माहिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल यांनी मुलींच्या हस्ते मशाल पेटवून नवरात्र महोत्सवाची केली सुरवात

 

उस्मानाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताईं पाटिल यांनी मुलींच्या हस्ते तुळजा भवानीची मशाल पेटवून नवरात्र महोत्सवाची सुरवात केली
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजा भावानी मातेच्या नवरात्र महोत्सावाला उत्साहात सुरुवात झाली आहे आपण पाहतो मशाल पुरुष पेटवतात परंतू मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मनसेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल यांनी परंडा येथून मुलींना घेऊन तुळजापूर येथून मशाल पेटवून एक समाजाला वेगळा संदेश दिला आहे
तुळजा भवानीच्या नवरात्र महोत्सवाला आज पासुन खर्या अर्थाने सुरुवात होत आहे आज पहाटे तुळजा भवानीची मुर्ती सिंहासनावर विराजमान झाली असुन आज पासुन नवरात्र महोत्सव सुरु झाला आहे राज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापुर शहरात दाखल होत आहेत आज खरे आकर्षण असते ते ज्योतीचे मुले व पुरुष ज्योत घेवुन येतात तुळजा भवानीच्या चरणी भेटवतात नंतर हि ज्योत गावाकडे घेवुन जातात आज महिला व मुलींनी ज्योत तुळजापुर शहरात आणली होती हे प्रथमच तुळजापुर शहरात पहायला मिळाले आहे मुली व महिला ज्योत घेवुन आल्याने सर्वांचे आकर्षण ठरले आहे सदरिल ज्योत त्यांच्या गावाकडे घेवुन जात असुन गावाकडे नवरात्र उत्सव साजरा करणार असे मानसेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल यांनी सांगितले