प्रहारच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्री प्रदिप वडतकर यांची फेर निवड – प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांचा बैठकीत आ.बच्चु कडू यांची घोषणा

0
706
Google search engine
Google search engine

अमरावती :- 

आगामी लोकसभा , विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक सर्कीट हॉउस अमरावती येथे पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक प्रमुख आ. बच्चु कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत प्रदिप वडतकर यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी फेर निवड करण्या संदर्भात पदाधिकार्यांनी एक मत दर्शविल्याने आ.बच्चु कडू यांनी त्याच्या नावाची घोषणा केली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांनी केलेल्या कार्याचा आढावा व आगामी निवडणूका लक्षात घेता संघटनात्मक बांधणी करिता आ.बच्चु कडू यांनी प्रमुख पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही संघटनात्मक फेर बदल करण्यात आले तसेच तिवसा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी देण्याबाबत जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसु यांच्या उमेदवारीची चाचणी करण्याचे आदेश आ.बच्चु कडू यांनी दिले.तसेच प्रदिप वडतकर यांचे मागील दोन वर्षातील संघटनात्मक काम व पक्षातील सक्रीयता पाहता त्यांच्या वर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची पून्हा जबाबदारी सोपविण्यात आली याबाबत आ.बच्चु कडू यांनी रितसर निवडीची घोषणा सुध्दा केली.यावेळी पदाधिकार्यांनी प्रदिप वडतकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बैठकीला जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसु , शहरप्रमुख चंदु खेडकर , तालुकाप्रमुख जोगेन्द्र मोहोड , विद्यार्थी जिल्हाप्रमुख पवन देशमुख , मनोज अंबाळकर , चंदु उगले  निलेश सावरकर , इमतीयाज अहमद , शिवाजी खाडे, सतिश भटकर , अर्पीत वडतकर यांची उपस्थिती होती