दर्यापुर रोडवरील जिवघेणे खड्ड्यांना रंगाचे पट्टे मारुन राहुल पाचडे यांनी केले अनोखे आंदोलन

0
874
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतिनिधी

अकोट दर्यापुर रोडवरील जिवघेणे खड्ड्यांना रंगाचे पट्टे मारुन शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधीकारिंनी आकोट सावरा मार्गाच्या दुर्दशेविरुद्ध आज रोष व्यक्त केला.यावेळी शिवसैनिकांनी राहुल पाचडे (शिवसेना उपतालुका अकोट) यांच्या पुढाकारात आणि समस्त पदाधिकारींच्या मार्गदर्शनाखाली या जिवघेण्या खड्ड्यांना रंगाचे पट्टे मारुन वाहनधारकांना सतर्क केले.तसेच या मार्गाच्या दुर्दशेवर व सा.बा.विभागाच्या ढीसाळपणाविरुद्ध रंगाचे पट्टे मारुन रोष व्यक्त केला.

यावेळी सा.बा.विभागात आंदोलक निवेदन देण्यासाठी गेले असता यावेळी संबधीत यंत्रणेची अनुपस्थीती असल्याचं निवेदन कर्त्यांच म्हणणं आहे. अकोट दर्यापूर या रोडवर हजारो प्रवाशी दररोज प्रवास करीत असून नागपूर कडे जाणारा हा मार्ग महत्त्वाचा राज्य महामार्ग असून या रोडवर अकोट शहरा पासून ते अकोट मतदार संघाच्या हद्दी पर्यंत जीव घेणे मोठे मोठे खड्डे पडले असून या रोडच्या दोन्ही बाजूच्या किनारा खचल्या आहेत. तसेच रोडची पूर्णतः चाळणी झालेली आहे त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. अशे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या जीवघेण्या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी मुठीत जीव घेऊन प्रवास करीत आहेत. उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी अनेक भाविक भक्तांची वरदळ या रोडवरून वाढणार आहे. तरी या रोडवरील जीव घेणे खड्डे बुजवण्यात यावे आशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे .अकोट दर्यापूर रोडवरील खड्डे त्वरीत नबूजवल्यास शिवसेना अकोट च्या वतीने सावरा फाट्यावर उग्रस्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी सा. बा. अकोला उपविभाग अकोटच्या जबाबदार अधिकाऱ्याची राहील.असे राहुल पाचडे यांनी कळवले आहे.

सदर आंदोलन
शिवसेना नेते दिवाकर रावते, पश्चिम संपर्क प्रमुख अरविंद सावंत, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख शाम गावंडे यांच्या मार्गदर्शनात राहुल पाचडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या अभिनव आंदोलनात रोशन पर्वतकार, गोपाल म्हैसने, नंदू कुलट, सागर गीते, नितीन सोनोने, नंदू सपकाळ, विशाल चौधरी, अनुभव कराळे, शाम मेंढे, अक्षय टेकडे, कुणाल पाचडे, सचिन काकड, रवी कोगदे, शैलेश देवळे, अजय पाचडे, शाम वाकोडे, मुन्ना भरणे, आकाश गीते, प्रफुल गुप्ता, प्रथमेश पाचडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.