आकोट पोलीसांच्या सजगतेने धक्कादायक घटना उघडकीस शाळकरी मुले व्हाईटनरच्या नशेत

0
1767

आकोट/ संतोष विणके

आकोट शहरातील शाळकरी मुले हे व्हाईटनरच्या नशेच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव एका घटनेने उघडकीस आणले असुन या प्रकाराने शिक्षक पालकांसह पोलिसही अचंबीत झाले आहेत. कागदावर लिहलेले खोडण्या साठी उपयोगात येणाऱ्या व्हाईटनर नामक रसायनाचा उपयोग नशा करण्या साठी करीत असल्याची धक्कादायक बाब अकोट शहरा मध्ये उघडकीस आली आहे., अकोट शहर पोलीस स्टेशनला दिनांक 7।10।18 रोजी एका पालकाने त्यांचा 12 वर्ष वयाचा मुलगा दुकानातून नोटबुक आणतो असे सांगून आई कडून 70 रुपये घेऊन दिनांक 6।10।18 रोजी संध्याकाळी गेला तो रात्र झाली तरी घरी न आल्या मुळे त्याचे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पन तो मिळून न आल्या मुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस स्टेशन अकोट शहर येथे तक्रार दिल्या वरून मुलगा अल्पवयीन असल्याने लगेच कलम 363 भारतीय दंड विधान प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके ह्यांनी तपास सुरू केला.दरम्यान त्याच दिवशी दुपारी मुलगा सुखरूप घरी आल्याची माहिती मिळाली, मुलगा व त्याचे वडील, भाऊ ह्यांना पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी समोर बोलावून विचारपूस केली असता सुरवातीला मुलाने खोटी नाटी माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर मुलाला व्हाईटनर रुमाला वर टाकून ओढतांना पाहणारे काही लोक समोर आणले असता व त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने नोटबुक घेऊन गांधी मैदान येथे गेलो होतो तेथे अचानक चक्कर आल्याने झोपून राहलो, दुसऱ्या दिवशी दुपारी शुद्ध आल्यावर शिवाजी चौकात गेलो व तेथून सायकल रिक्षा मध्ये बसून घरी गेलो, मुलाने वडिलांना सुद्धा हेच सांगितले परंतु त्याने सांगितलेल्या माहिती मध्ये काही तथ्य आढळले नसल्याने पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आणखी गोपनीय चौकशी केली असता नमूद मुलगा व त्याचे समवयस्क 3 मुले ह्यांनी गांधी मैदानात अंधाऱ्या जागी इलेक्ट्रिक डीपी जवळ व्हाईटनर चा नशा केला व नशा प्रमाणाच्या बाहेर झाल्याने हा मुलगा बेशुद्ध पडल्याने इतर मुले कशी तरी घरी गेली व हा मुलगा तेथेच पडून राहिला ,दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर तो शिवाजी चौकात गेला व तेथून रिक्षा करून घरी गेला, ह्या वरून लहान मुलां मध्ये अतिशय स्वस्त व सहज मिळणाऱ्या व्हाईटनर चा नशा करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते, करिता पालक व शिक्षक ह्यांनी जाणीव पूर्वक लक्ष देण्याची गरज असून लहान मुलांचे प्रबोधन करण्याची सुद्धा गरज असल्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले असून व्हाईटनर विकणाऱ्या स्टेशनरी दुकानदारांनी सुद्धा वारंवार व्हाईटनर खरेदी करणाऱ्या मुलांना व्हाईटनर विकत देऊ नये असे सुद्धा पोलिसांनी आवाहन केले आहे, संस्काराचा अभाव व वाईट संगतीमुळे लहान मुले वाम मार्गाला लागत असून, प्रसंगी चोरी सारखा गंभीर गुन्हा सुद्धा करीत आहे,ह्याचा समाजाच्या जबाबदार घटकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.या प्रकाराने भलत्याच नशेच्या आहारी बाल वयातच जाणारी ही मुलं वाम मार्गाला लागुन समाजाला डोकेदुखी ठरु शकतात त्यामुळं समाजमनानेही आता सजग राहण्याची वेळ आली आहे.एवढे मात्र खरे