तरुणाईच्या जल्लोष नृत्यविष्काराने फुलला भूमी फाऊंडेशनचा गरबा दांडीया महोत्सव

0
1044
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

तरुणाईच्या तुफान जल्लोष अन नृत्यविष्काराने भूमी फाऊंडेशनचा गरबा दांडीया महोत्सव उत्साह उल्हासात पार पडला.युनाटेड 18 प्रस्तुत भूमी गरबा दांडीयाच्या या भव्यदिव्य स्पर्धेत पारंपारिक पेहराव मध्ये तरुणाईचा लयबद्ध अविष्कार पहायला मिळाला. शांततेत,आनंदाने व शिस्तबद्ध पध्दतीने साजरा झालेल्या या महोत्सवाला दरवर्षी प्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद मिळाला.

_सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य स्वयंसेवी संस्था भूमि फाऊंडेशन(विदर्भ)च्या गरबा महोत्सवाने रविवार ला शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात आनंद व उत्साहाला उधाण आणले.कार्यक्रमात तरुणाईचा लयबध्द नृत्याविष्कार,पदलालित्य,पारंपारिक पेहराव स्पर्धा मधील चमुने केले होते.भूमी रास दांडीयाला दिप प्रज्वलन व दुर्गा देविच्या प्रतीमेचे मान्यवराच्या हस्ते पुजन करुन युनाटेड 18 प्रस्तुत भूमी रास दांडीयाचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये श्री.गजानन शेळके ठाणेदार अकोट शहर, भूमीपुञ अॉनरेबल लेफ्टनंट सुभेदार मेजर सुनिल डोबाळे(ताजणापुरकर)प्रशांत पाचडे,दिपक बोडखे,महेश गणगणे,सौ. मिनाताई धूळे मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय अकोट,नंदु शेगोकार हे विचार पिठावर उपस्थित होते. अॉनरेबल लेफ्टनंट सुभेदार सुनिल डोबाळे ताजणापुरकर (पुणे)यांना भूमी गौरव सन्मानाने सत्कार करुन समान्नित करण्यात आले.

मान्यवराचे स्वागत व मार्गदर्शन नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये एकून ३२ चमुने भाग घेताला होता तसेच सोलो कपल गरबा असे विभाजन करण्यात आलेले होते.१५० स्पर्धाकांनी आपला सहभाग नोंदविला होता.हजारो प्रक्षेकांच्या ,प्रतिसादात मनमुराद आंनद घेतला .गरबा नृत्याला परीक्षक म्हणून सागर गवळी व प्रा.बबिता हजारे मँडम यांनी केले.या मधे वेशभूषा,सुंदर नृत्यकला अविष्कार साठी वेगवेगळे पारितोषिक देण्यात आले यामधे अष्टभूजा ग्रुप,नाथुबाबा ग्रुप,गुज्जू ग्रुप व भवानी ग्रुप यांना प्रमथ,द्वितीय व तृतिय बक्षीस देण्यात आले तसेच प्रोत्साहन पर बक्षिसे सुध्दा मान्यवराच्या हस्ते विजयी स्पर्धाकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

भूमी गरबा महोत्सवात स्पर्धा व आनदांला उधान व उत्साही असतांना वेळीची शिस्तबद्ध पध्दतीने व वेळीची मर्यादा पाडली व १० वाजताची मर्यादा पाडून गरबा संपवून आनंदायी वातावरण पार पडला. कार्यक्रम उत्तम पध्दतीने पार पडण्यासाठी भूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ सचिव चंचल पितांबरवाले,प्रीति धुमाळे, पंकज अंबूलकर,अमोल पवार,कमलेश राठी,शिल्पा राठी,संदेश चोंडेकर,अजहर भाई,अक्षय जायले,आकाश धुमाळे,किर्ती पितांबरवाले,अजय तेलगोटे यांनी परीश्रम घेतले.बहारदार कार्यक्रमचे संचालन हर्षल बहादुरे तर आभार विशाल राठौड यांनी मानले.