कायदाचे पालन करत दुर्गोत्सव उत्साहाने साजरा करुयात – उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपुत

0
917

शहर पो.स्टे.येथे शांतता सभेचे आयोजन

अकोट/संतोष विणके

आकोट शहर पो स्टे येथे उद्या निघणाऱ्या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीच्या पुर्वसंध्येला शांतता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपुत हे होते तर मंचावर न.पा.मुख्याधिकारी प्रशांत रोडे व शहर ठाणेदार गजानन शेळके यांची उपस्थीती होती.

यावेळी उदयसिंग राजपुत यांनी कायदाचे पालन करत दुर्गोत्सव उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले तसेच फक्त प्रशासनाच्या भरवश्यावर कोणत्याही शहरात कायदा व सुवयवस्था सांभाळणे शक्य नाही, जबाबदार नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असते म्हणुन शहरा वासियांनी सहभागातुन शांतता प्रिय उत्सव साजरा करुयात. यावेळी ठाणेदार शेळके यांनी सभेला उद्बोधन करतांना म्हटले की अकोट शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाते, अकोट शहराच्या ईतिहास मध्ये आज पावेतो 26 छोट्या मोठ्या दंगलीच्या नोंदी आहेत, 2012 मध्ये दुर्गा विसर्जन दरम्यान दंगल उसळून मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाली होती, अकोट शहराची संवेदनशील शहर ही ओळख पुसून सकारात्मक ओळख निर्माण व्हावी म्हणून सर्व चांगल्या प्रवृत्तीने समोर येऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले

,अकोट शहर येथे आयोजित शांतता समिती सभे मध्ये ते बोलत होते, सुरवातीला गणेश विसर्जन मिरवणुकी मध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या विविध गणेश मंडळांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश उत्सवात बंदोबस्ता वर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांचे जेवणाची व पिण्याचे पाण्याची सोय केल्या बद्दल त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला, ज्या मध्ये विदर्भ उपाध्यक्ष अजय ठाकूर, अकोला जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन पितांबरवाले, अकोट तालुका प्रमुख अनिल वगारे ह्यांचा समावेश आहे, सभेत ऍड गांधी, राजुभाऊ नागमते, मायाताई म्हैसने, अनंता मिसाळ, ह्यांनी आपले मत मांडले

सदर सभेला शांतता समिती सदस्य, पत्रकार, दुर्गा मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच पोलिस स्टेशन अकोट शहर चे साह्ययक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, महेंद्र गवई, आशिष शिंदे, राजू सोळंके उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले.