शंकरराव बोरकर पब्लिक स्कूल पाटोदा येथे भव्य विज्ञान आणि कला प्रदर्शन

0
1233
Google search engine
Google search engine

शंकरराव बोरकर पब्लिक स्कूल पाटोदा येथे भव्य विज्ञान आणि कला प्रदर्शन

उस्मानाबाद – ता . 16 ऑक्टोबर रोजी पूर्व राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान आणि कला प्रदर्शनआयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना *बीड जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, प्रसंगी व्यासपीठावर पाटोदाचे सरपंच श्री बाळासाहेब देशमुख, उपसरपंच श्री गोविंद जामदार, संस्थेच्या सचिव श्रीमती रुक्मिणीताई झिरमीरे, अविनाश उगले, किशन उगले, श्री बुबा काटे, चेअरमन ललितभैय्या झिरमिरे, मुख्याध्यापक सिकंदर पीरजादे सर, जालिंदर तोडकर , वैजनाथ सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व पालक, गावातील नागरिक पंचक्रोशीतील शाळेतील विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक, प्राचार्य, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविलेले 110 प्रयोग केले होते. विद्यार्थ्यांनी केलेला प्रयोगाचे कौतुक शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले