*अमरावती येथे आम आदमी पक्षा तर्फे सैन्य भरती मार्गदर्शन शिबिर संपन्न*

0
718
Google search engine
Google search engine

अमरावती :-

दिनांक 17-10-2018 रोजी स्थानिक श्री गरुदेव प्रार्थना मंदिर अमरावती येथे आप युथ विंग अमरावती जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक म्हणुन लेफ्ट. कमांडर डॅा अलिम पटेल ( माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी) हे लाभले.सैन्य भरती बद्दल त्यांनी सविस्तर माहिती उदाहरणे, प्रात्याक्षिके दाखवुन दिली. शारीरिक चाचणी, फिजीकल टेस्ट, मेडीकल टेस्ट, लेखी परिक्षा याची टप्याटप्याने देण्यात आली तसेच भविष्यातील फायदे कोणते आहेत हे सांगितले . आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडु नये. प्रामाणिक व इमानदारीने प्रयत्न केला तर नक्कीच यश प्राप्त होते व आपण आयुष्यात कोणत्याही प्रसंगी मागे पडत नाही. आत्मविश्वासाने पुढे जातो.

प्रास्ताविक श्री किरण गुडधे, संचलन श्री सुयोग माथुरकर व आभार डॅा महेश बलांन्से यांनी केले.
या शिबिराला रंजना मामर्डे, किशोर वानखडे, राहुल चव्हाण, अशोक वानखडे, श्रीमती शुक्ला, श्रीवास्तव सर, प्रेम वानखडे, कावनपुरे काका व अनेकांचे सहकार्य लाभले. या शिबिराला असंख्य युवकांनी लाभ घेतला. भविष्यातही असे अनेक कार्यक्रम आप युथ विंग द्वारे देण्यात येईल असे आप युथ विंग अमरावती जिल्हा संयोजक श्री सुयोग माथुरकर यांनी सांगितले.