देवदत्त मोरेंनी योगीताला दत्तक घेतले ; आज कसबे तडवळ्यात भव्य दत्तक सोहळा उत्साहात संपन्न

0
2489

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यातील क तडवळे येथील प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांनी विजयादशमीचे ओचित्य साधून मलकापूर ता .कळंब येथील एका गरीब कुटुंबातील मुलगी दत्तक घेतली गुरुवार दि १७ रोजी क तडवळे येथे विधीवत आणी शानदार सोहळ्यात हा दत्तक विधी कार्यक्रम पार पडलायाबाबत सविस्तर वृत्त असे की उद्योजक देवदत्त मोरे यांच्या वंशाला मुले आहेत परन्तु मुलगी नसल्याचे दुःख होते घरात घरपण येण्यासाठी कन्यारत्नाची गरज असते मुलगी लागते मुलगी पाहिजे अशी इच्छा मोरे कुटुंबाची होती गेल्या दोन तीन वर्षांपासून ते मुलगी दत्तक घेण्याचे बघत होते मअध्यनंतरी काळात मलकापूर येथील अण्णासाहेब भिमराव लोमटे यांची मुलगी योगिता हीचा अर्चना देवदत्त मोरे यांच्याशी काही कारणास्तव संपर्क व सहवास आला , योगीताही उचशिक्षित व तिची जिद्द, चिकाटी व मनमिळावू पणा चांगलाच भावला,घरची परिस्थिती गरिबीची असून देखील तिने चिकाटीने बी ए च्या संस्कृत या विषय घेऊन सेकंड द्वितीय वर्षात शिकतं हाती , कुटुंबात मुलगी असावी अशी इच्छा मोरे कुटुंबाची होती त्यामुळे अर्चनाताई यांनी योगीताला आमच्याकडे कायमची राहण्याविषयी विचारपूस केली त्यावर योगिता राहण्यास तयार झाली , त्यानंतर योगीताचे वडील आण्णासाहेब लोमटे आणी आई प्रतिभाताई लोमटे भाऊ अजय लोमटे यांच्यासोबत दत्तक घेण्याबाबत ची विचार विनिमय झाला व त्यांनी होकार दिला व त्यानंतर गुरुवारी दि १७ रोजी योगिता कडील आई वडील व सर्व पाहुणे व काही निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत विधीवत दत्तक विधान सोहळा पार पडला, यावेळी मलकापूर येथील श्री एकनाथ महाराज लोमटे शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले होते तसेच यावेळी देवदत्त मोरे यांचे जेष्ठ चिरंजीव आदेश मोरे , तसेच उस्मानाबाद ,कळंब,बार्शी येडशी व इतर ठिकाणांहून आलेले मित्र परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते