होम मिनिस्टर ठरल्या प्रतिभा चौधरी – आई प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सहात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

0
1208

 

कोंढवा :श्री अनिल चौधरी –

महालक्ष्मी नवरात्र उत्सव समिती  व आई प्रतिष्ठान कोंढवा खुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्त महिलांचा आवडता खेळ होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा ) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अत्यंत अतितटीच्या सामन्यात प्रतिभा अनिल चौधरी या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस पैठणी व फ्रीज मिळाले आहे.

   आई प्रतिष्ठानच्या वतीने स्रियांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या  उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.आपल्या रंगतदार व ढंगदार मिस्किल,विनोदी संवाद शैलीने ताईंची मने जिंकण्याचे भाऊचे काम प्रसिद्ध निवेदक निलेश पापट आणि दीपिका पापट यांनी केले. खेळीमेळीच्या वातारणात मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडला. याचा लाभ परिसरातील अनेक माता भगिनींनी घेतला.या मंडळाने आजपर्यंत अनेक सामाजिकसांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या नावाचा ठसा उमटविला व बऱ्याच वर्षांपासूनची आपली परंपरा व आदर्श कोंढवा वासियांसमोर  कायम ठेवला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे ८० पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

  प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रतिभा अनिल चौधरी यांना मानाची पैठणी व फ्रीज स्मिता बाबर यांच्या हस्ते देण्यात आले.  व्दितीय क्रमांकाचे बक्षीस सुरेखा साबळे यांना  वाशिंग मशिन देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे मंगल सोनावणे यांना , चौथ्या क्रमांकाचे  आशा जाधव यांना टेबल फॅन देण्यात आले तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर निकम ताई यांना देण्यात आले.

     याप्रसंगी मा.आ.महादेव बाबर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद बाबर , युवराज बाबर, अमर बाबर, स्मिता बाबर, शकुंतलाताई चौधरी, शशिकला शेंडकर, विजया झुरुंगे, मालन दीक्षित, अमिना भाभी आदी उपस्थित होते.