अवघ्या दीड तासात ट्रक चोरीचा गुन्हा उघड ; ११ लाखाचा मुद्देमाल व आरोपी बेंबळी पोलीसांच्या ताब्यात.

1213

उस्मानाबाद – औसा रोडवर पाडोळी (आ) शिवारात अंबिका स्टोन क्रशरच्या जवळ ट्रकच्या आडवी मोटार सायकल लावुन ट्रक ड्रायव्हर व क्लिनरला मारहाण करुन ट्रक घेऊन आरोपींनी पलायन केले.हा ट्रक लक्ष्मी निवास ॲग्रो इंडस्टीज रायचुर कर्नाटक येथुन ८०० तांदळाची पोती घेऊन सिल्वासा गुजरात येथे जात होता. उस्मानाबाद तालुक्यातील येवती येथील ज्ञानेश्वर बाबासाहेब हुबाले वय २२ व राहुल शत्रुघ्न गायकवाड वय २८ या दोघांनी या ट्रकचा पाठलाग निलंगा येथुन केला होता.पाडोळी शिवारात हा ट्रक आल्यानंतर मारहाण करुन ट्रक ताब्यात घेऊन उस्मानाबादच्या दिशेने निघुन गेले.ही घटना दि.१९ रोजीची सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.अंबिका स्टोन क्रशरचे मालक हरिदास एकंडे यांनी लागलीच फोनवरून पाडोळी दुरक्षेत्राचे पोहेकॉ.हनुमंत चव्हाण यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.व हा ट्रक उस्मानाबादच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली.पाडोळी(आ) दुरक्षेत्राचे पो.हे.कॉ.हनुमंत चव्हाण व पो.कॉ.भागवत वाघमारे व पोलीस मित्र शाहुराज खराडे यांनी समुद्रवाणी पाटीजवळ विशाल धाब्याजवळ हा ट्रक अडवुन आरोपीसह दरोडा प्रतिबंधक पथकाच्या गस्ती पथकावर असलेल्या पोलीस टीमला माहिती दिली.सपोनि.उत्तम जाधव,हेकॉ तानाजी माळी,पोना.आण्णासाहेब खोगरे,चालक पोना.रविंद्र कचरे,जिविशाचे चंद्रसेन राऊत यांनी तात्काळ ट्रक व आरोपींना ताब्यात घेतले.ट्रक चालक शमशोद्दिन हैदरसाहेब हसुरीवाले रा.परतापुर ता.बस्वकल्याण जि.बिदर यांच्या फिर्यादीवरुन बेंबळी पोलीसांत गुन्हा दाखल असुन पुढील तपास सपोनि उत्तम जाधव हे करीत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।