व्हॉट्सअॅप ग्रुप अडमिन जरा सावधान पोस्ट शेअर करतांना करा थोडा विचार करा

0
823
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान )

   सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया चा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. व्हॉट्सअॅप वरून कोणाच्या भावना दुखवणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्यावर आतापर्यंत मोठ्या शहरात कारवाई होतांना आपल्याला दिसल्या. मात्र आता हळू – हळू ह्याचे लोन ग्रामीण भागात पसारतांना दिसून येत आहे. असाच एक प्रकार दसऱ्याच्या दिवशी चांदूर रेल्वे शहरात घडला. एका ग्रुप वर इतरांची मन दुखवणारी पोस्ट शेअर झाल्याने पोलिसांनी शेअर करणाऱ्याला व ग्रुप अडमिनला काही काळासाठी ताब्यात घेतल्याचे समजते.

     खरं तर मोठ्या शहरासोबतच ग्रामीण भागात अँडरॉइड मोबाईलची क्रेज जरा जास्त प्रमाणात दिसून येत आहे. महाविद्यालयात शिकणारा तरुण असो की तरुणी, शेतात जाणार तरुण वा वयोवृद्ध शेतकरी, मजूर ह्यासर्वांकडे आता महागडे अँडरॉइड मोबाईल दिसून येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो तो व्हॉट्सअॅप चा. अलीकडील काळात तर गावात आपापल्या परिसरातील लोकांनी आपले ग्रुप तयार केले असुन या ग्रुपच्या माध्यमातून अनेक नेते सुध्दा तयार झाले आहेत आणि त्यावरून वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जात आहे. पण त्या शेअर केलेल्या पोस्ट टाकतांना समाजाचे भावना तर दुखावल्या जाणार नाही ना ? याचा अभ्यास व कायदा ग्रामिण भागातील लोकांना नाही. त्याचाच प्रत्यय चांदूर रेल्वे शहरात दसऱ्याच्या दिवशी अनुभवाला आला. एका मित्र मंडळ या नावाने असलेल्या ग्रुपवर सामाजिक भावना दुखावल्या जाईल अशी पोस्ट आल्याची तक्रार एका मंडळाच्या अध्यक्षाने केली होती. त्याच्या आधारावर पोलिसांनी त्याग्रुप च्या सर्व अॅडमिन आणि पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. मात्र नंतर त्यांना समज देत सोडण्यात आले. परंतु ऐन दसऱ्याच्या दिवशी घरबसल्या आलेल्या या संकटामुळे अनेक ग्रुप अॅडमीन खडबडून जागे झालीत तर अनेकांनी अनेक ग्रुप मधून काढता पाय घेतला. शहरात झालेल्या या  प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे. गल्लोगल्लीत या व्हॉट्सअॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या अतिप्रिय व्हॉट्सअॅपमुळे लोकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट शेअर करताना थोडा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.