आमला येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन – समतादुत सलीम पठान यांनी केले मार्गदर्शन

0
801
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन शिक्षण संस्था, पुणे द्वारा मार्गदर्शनपर प्रबोधन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन शिक्षण संस्था, पुणे द्वारा समतादूत सलीम खान पठाण यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना समतेची शिकवण व थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्य विषयावर मार्गदर्शनपर प्रबोधन केले. तसेच जीवनात वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवुन सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्या श्रीमती भटकर मॅडम यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.