अखेर बाराव्या दिवशी गुन्हा दाखल ; आता औशाचे पोलिस आरोपिला अटक कधी करणार? गोलमाल है ये गोलमाल

0
983
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – ता १२ रोजी कोंड ता उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले रावासाहेब जमादार हे औसा तालुक्यातील आलमला पाटिवर रस्ता ओलांडत असताना त्यांना मोटारसाकल ने धडक दिल्यामुळे त्यांचा जागेवरच म्रत्यू झाला होता सदर घटनेची नोंद लातूर येथील सरकारी दवाखान्यातील पोलिस चौकित करून पुढिल तपास हा लातूर पोलिसामार्फत औसा पोलिस ठाण्याकडे वर्ग करायचा होता परंतू दहा दिवस या घटनेची फाईल मध्येच गायब झाली होती आज बाराव्या दिवाशी या प्रकरणाला मुहर्त मिळाले . आज औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . येवढे दिवस विलंब लावणार्या कर्मचार्यावर लातूर पोलिस अधिक्षक कार्यवाही करणार का ? असा सवाल मयत रावसाहेब जमादार यांच्या पत्नि रेखा जमादार यांनी आमच्याशी बोलताना केला आहे तसेच त्यांच्या मुलांना लातूर येथील पोलिस फाईल गहाळ झाली आहे . शोधून देऊ आसे म्हणून उडवाउडवीची उत्तरे देत होते मयताच्या मुलांना टोलवाटोलवी करत होते त्या मुलांना सतत लातूर पोलिस ठाण्यात हेलपाटे मारून नाहक त्रास सहन करावा लागला आहे . फाईल गहाळ कशामुळे झाली ? आरोपी फरार कसे काय झाले ? व ढाब्यावर लावलेली मोटार सायकल कोण पळवली ? या घटनेने लातूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सदर प्रकार हा पोलिसांनी तर गोलमाल केला नसावा असा संशय हि रेखा जमादार यांनी व्यक्त केला आहे . या घटनेकडे पोलिस अधिक्षकांनी लक्ष देऊन मयताच्या कुटूंबाला न्याय द्यावा अशी मागणी जमादार परावाराकडून केली जात आहे